एका महिन्यात ४ लाखांवर वीज ग्राहकांनी नोंदविले मोबाईल क्रमांक
By admin | Published: July 6, 2017 07:54 PM2017-07-06T19:54:44+5:302017-07-06T19:54:44+5:30
विदर्भातीत १६ लाख ग्राहक झाले ‘अपडेट’
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महावितरण कडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज देयकाची रक्कम, किती युनिटचा वापर झाला, खंडितवीज पुरवठा यासंदभार्तील माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळत आहे. १ जून २०१७ पासून १ जुलै २०१७ या एका महिन्यातच तब्बल ४ लाख १२ हजारापेक्षा अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केल्याची माहिती समोर आली आहे.
महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कायार्लायांतर्गत असलेल्या विदभार्तील तब्बल १६ लाख ५१ हजार ५४९ ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. अद्यापही एकून ग्राहकांपैकी केवळ ३४.९७ टक्के ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला असला तरी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागिल महिन्याभरात याकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याने केवळ जून महिन्यात मोबाईल नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांच्या संख्येत ८.७४ टक्क्यांची घसघसित वाढ झाली आहे. वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक नोंदणीत नागपूर परिमंडलाने आघाडी घेतली आहे. यात नागपूर शहर मंडलातील १ लाख ११ हजार ४६४ ग्राहकांनी, नागपूर ग्रामिण मंडलातील १ लाख ४९ हजार २२८ तर वर्धा मंडलातील २ लाख ९ हजार ६६५ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.चंद्रपूर परिमंडळाअंतर्गत चंद्रपूर मंडलातील १ लाख ८९ हजार ९७५, गडचिरोली मंडलातील ९४ हजार ४४१ ग्राहकांनी, गोंदीया परिमंडलांतर्गत असलेल्या गोंदीया मंडलातील ८५ हजार ६०८, तर भंडारा मंडलातील ७० हजार ६०८ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.
महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील १ लाख ४८ हजार ३७० ग्राहकांनी, बुलढाणा मंडलातील २ लाख ८ हजार ७५३ ग्राहकांनी तर वाशिम मंडलातील ४७ हजार ४४७ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंद केली आहे. याचसोबत अमरावती परिमंडलांतर्गत असलेल्या अमरावती मंडलातील २ लाख ११ हजार ८१ ग्राहकांनी तर यवतमाळ मंडलातील १ लाख २५ हजार २११ ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या एसएमएसच्या माध्यमातील सर्व सेवा मोबाईलवर मिळविणे सुरु केले आहे.