अकोला जिल्हयात फिरत्या लोक न्यायालयाचे उदघाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 12:25 PM2018-09-01T12:25:06+5:302018-09-01T12:27:02+5:30
अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.
अकोला : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या विधी सेवा उप-समितीच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात १ ते २९ सप्टेंबर दरम्यान फिरते लोक न्यायालय राहणार असून या न्यायालयाचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.
फिरत्या लोक न्यायालयामध्ये दाखलपूर्व, प्रलंबित प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. यामध्ये धनादेश अनादर, फौजदारी प्रकरण, अपघात प्रकरण, महसूल व दिवानी प्रकरणांचा तडजोड करून निपटारा करण्यात येणार आहे. फिरत्या न्यायालयाचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, सचिव पी. एस. पोळ, एस. एस. हीरुरकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र शाह, इलीयास शेखानी उपस्थित होते. ज्या नागरिकांची प्रलंबित प्रकरणे आहेत, त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोक न्यायालयाचा तालुकानिहाय कार्यक्रम
अकोला तालुका - १ सप्टेंबर बोरगाव मंजू, २ सप्टेंबर हुतात्मा स्मारक नेहरू पार्कजवळ अकोला, ३ सप्टेंबर गांधी जवाहर बाग, ४ सप्टेंबर गुलाम नबी आझाद सभागृह न्यू ईरा हायस्कूलजवळ, ५ सप्टेंबर ललित कला भवन डाबकी रोड अकोट तालुका - ६ सप्टेंबर चोहोट्टा बाजार, ७ सप्टेंबर मुंडगाव, ८ सप्टेंबर अकोट न्यायालय परिसर, ९ सप्टेंबर अकोलखेड. तेल्हारा तालुका - १० सप्टेंबर दानापूर, ११ सप्टेंबर अडसुळ, १२ सप्टेंबर हिवरखेड, १३ सप्टेंबर तेल्हारा, बाळापूर तालुका - १४ सप्टेंबर पारस, १५ सप्टेंबर बाळापूर, १६ सप्टेंबर वाडेगाव, १७ सप्टेंबर उरळ, पातूर तालुका - १८ सप्टेंबर आलेगाव, १९ सप्टेंबर खेट्री, २० सप्टेंबर चान्नी, २१ सप्टेंबर शिर्ला, बार्शीटाकळी तालुका - २२ सप्टेंबर बार्शीटाकळी, २३ सप्टेंबर कान्हेरी, २४ सप्टेंबर पिंजर, २५ सप्टेंबर महान, मूर्तिजापूर तालुका - २६ सप्टेंबर माना, २७ सप्टेंबर कुरुम, २८ सप्टेंबर मूर्तिजापूर आणि २९ सप्टेंबर हातगाव.