सायबर क्राइम रोखण्यासाठी रस्त्यावर मोबाइल सर्चिंग!

By Admin | Published: January 22, 2015 02:08 AM2015-01-22T02:08:38+5:302015-01-22T02:08:38+5:30

अकोला पोलिसांनी केली नागरिकांच्या मोबाइलची तपासणी.

Mobile search on road to prevent cybercrime! | सायबर क्राइम रोखण्यासाठी रस्त्यावर मोबाइल सर्चिंग!

सायबर क्राइम रोखण्यासाठी रस्त्यावर मोबाइल सर्चिंग!

googlenewsNext

अकोला: धार्मिक भावना दुखावून जातीय दंगली भडकाविण्याच्या उद्देशाने समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. अश्लील छायाचित्रे व मजकूर, देवी-देवता, थोरपुरुषांची विकृत छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ पसरविण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या माध्यमातून घडणार्‍या गुन्हय़ांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोबाईल फोन्स सर्चिंंंगची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी बुधवारी अकोला शहरातील नागरिकांच्या मोबाईल फोन्सची तपासणी केली.
फेसबुक, व्हॉट्स अँप, ट्विटरचा गैरवापर वाढला आहे. अश्लील संदेश, विटंबनात्मक छायाचित्रे टाकून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बरेचदा होतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी बुधवारी अकोल्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी शहरातील सातही ठाणेदारांना त्यांच्या पोलीस स्टेशन्सच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन्स तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार बुधवारी खदान पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या परिसरातील चौकांमध्ये पोलिसांनी युवक, युवती, महिला, पुरुषांना थांबवून त्यांच्या मोबाइल फोन्सची तपासणी केली. कुणाच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह मजकूर, अश्लील छायाचित्रे आढळल्यास ती पोलिसांनी नष्ट करायला लावली.
व्हॉट्स अँप, फेसबुकद्वारे अश्लील संदेश, धार्मिक भावना दुखावणारा मजकूर किंवा विटंबनात्मक छायाचित्रे टाकण्यात येत असल्याने धार्मिक तेढ निर्माण होऊन तणाव निर्माण होत आहे. या दृष्टिकोनातून बुधवारी पोलिसांना मोबाईल तपासण्याचे आदेश दिले होते; परंतु नंतर ही मोहीम रद्द केली असल्याचे साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले.


*खदान पोलिसांनी तपासले १५0 मोबाइल
खदान पोलिसांनी बुधवारी आदर्श कॉलनी, राष्ट्रीय महामार्गावरील महाकाली हॉटेलसमोर आणि नेहरू पार्क चौकामध्ये नागरिक, युवक व युवतींना थांबवून त्यांच्या मोबाइलची तपासणी केली. यावेळी १५0 मोबाइलची तपासणी केली.

Web Title: Mobile search on road to prevent cybercrime!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.