पश्चिम विदर्भात मध्यम स्वरू पाचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:58 AM2017-08-21T01:58:34+5:302017-08-21T01:59:38+5:30
अकोला : एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर विदर्भात पावसाला सुरुवात झाली आहे; परंतु पश्चिम विदर्भातील चार जिल्हय़ांत आणखी पावसाचा तुटवडा कायम आहे. अकोला जिल्हय़ात हलका ते मध्यम स्वरू पाचा पाऊस झाला, पण अद्याप ३२ टक्के पावसाची तूट कायम आहे. असे असले तरी हलका ते मध्यम पावसाने मूग, उडीद पिकांना संजीवनी मिळाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

शुक्रवारपासून विदर्भात पावसाला सुरुवात झाली असली, तरी या पावसाचे सार्वत्रिक स्वरू प नसल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे. हा पाऊस तालुकानिहाय होत असल्याने पावसाची टक्केवारी वाढलेली दिसत आहे. असे असले, तरी या पावसाने माना टाकलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. पश्चिम विदर्भातील मूग, उडीद या अल्पकालीन पिकांना हा पाऊस प्रचंड पोषक ठरला आहे. ही दोन पिके ऐन सणासुदीच्या पूर्वी परिपक्क होत असल्याने शेतकर्यांच्या हातात दिवाळी, दसर्याच्या अगोदर पैसा येतो. ही पिके काही ठिकाणी फुलोर्यावर, शेंगावर आहेत. दरम्यान, रविवार सकाळी ८.३0 ते सांयकाळी ५.३0 वाजेपर्यंत अकोला येथे १५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, बुलडाणा येथे ३९.0 मि.मी., वाशिम ५८.0 मि.मी., अमरावती २८.0 मि.मी., यवतमाळ ३९.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाची तूट
पाऊस सुरू असला, तरी अद्याप पश्चिम विदर्भात पावसाची तूट कायम आहे. अकोला जिल्हय़ात ही तूट ३२ टक्के असून, वाशिम २४ टक्के, अमरावती ३९ टक्के, तर यवतमाळची तूट ३५ टक्के आहे.
-