मोदी सरकार शेतकरी, कामगार विरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:21 AM2021-02-09T04:21:27+5:302021-02-09T04:21:27+5:30
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेअंतर्गत अकोट व तेल्हारा तालुक्यातील राकॉं कार्यकर्त्यांशी रविवारी रात्री संवाद साधला. त्यांनी राज्य शासन मागासवर्गीय, दलित, ...
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेअंतर्गत अकोट व तेल्हारा तालुक्यातील राकॉं कार्यकर्त्यांशी रविवारी रात्री संवाद साधला. त्यांनी राज्य शासन मागासवर्गीय, दलित, अल्पसंख्याक, शेतकरी, कामगारांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. शासनाच्या योजना जनमानसापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची आहे. तसेच गावपातळीवर पक्षाची मजबूत बांधणी करून जनमानसांशी संवाद साधणे आणि त्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्ह्याचे संपर्कमंत्री ना. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक प्रवीण कुंटे, माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार हरिदास भदे, माजी आमदार तुकाराम बिडकर, ज्येष्ठ नेते नानासाहेब हिंगणकर, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राजीव बोचे, कृउबास उपसभापती शंकरराव चौधरी, जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, अमोल काळणे उपस्थित होते.
राकॉंचे अकोट तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर, तेल्हारा तालुकाध्यक्ष प्रा. प्रदीप ढोले, अकोट शहराध्यक्ष प्रा. नवनीत लखोटिया, तेल्हारा शहराध्यक्ष मो. सलिम यांनी जयंत पाटील व मान्यवरांचे स्वागत केले. तालुकाध्यक्ष कैलास गोंडचवर व प्रा. प्रदीप ढोले यांनी तालुकास्तरावर राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व पक्ष बांधणीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव इंजि. प्रमोद लहाने यांनी केले. कार्यक्रमाला देवानंद मर्दाने, सैय्यद मतीन अहमद, छाया कात्रे, वृंदा मंगळे, राम म्हैसने, गणेश कुकडे, मनीषा देशमुख, शारदा थोटे, चारुलता थेटे, श्रद्धा गट्टे, राजू खान, विनोद मिरगे, सुरेश दायमा, कैलास ढोकणे, प्रशांत गेबळ, अजमतभाई, नागेश आग्रे, शेखर भिसे, अशोक सदाफळे, हनुमंत सपकाळ, कैलास थोटे, दयाराम धुमाळे, उल्हास कुलट, फैजानभाई, अल्ताफ मिर्झा, गजानन गावंडे, नंदकिशोर भांबुरकर उपस्थित होते.
फोटो: