मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:43 PM2019-04-02T12:43:48+5:302019-04-02T12:45:09+5:30

राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.

Modi must; But get rid of corruption! ; Passengers view in akola to patur | मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

मोदीच हवेत; पण भ्रष्टाचाराला आळा बसवा! ; अकोला ते पातूर प्रवासादरम्यान प्रवाशांचा सूर 

googlenewsNext

अकोला: उण्यापुऱ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने जागतिक स्तरावर भारताचे स्थान मजबूत केल्याचे पाकिस्तानवरील हल्ल्यावरून दिसून आले. पुलवामातील भ्याड हल्ल्यानंतर जगातील प्रमुख देश भारताच्या बाजूने उभे होते. यावरून भारताचे नेतृत्व कणखर असल्याचे दिसते. राष्ट्रहिताचा मुद्दा लक्षात घेता चीन व पाकिस्तानाला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधानपदी मोदीच हवेत; पण भ्रष्टाचारालाही आळा बसावा असा सूर अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटीतील प्रवाशांमधून उमटला.
अकोला ते पातूर प्रवासादरम्यान एसटी बसमध्ये सतीश देशमुख यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर केंद्र व राज्य शासनाने आणखी कठोर पाऊले उचलण्याची मागणी केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्यांना कमालीचा मानसिक त्रास होतो. आर्थिक शोषणाला आळा घालण्यासाठी शासनाने कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली. केंद्रात भाजप असो वा काँग्रेस सरकार त्यांनी देशहितासोबतच विकासाला प्राधान्य देण्याचे मत देशमुख यांनी मांडले. मोहन शर्मा म्हणाले की देशाचे नेतृत्व करणारा व्यक्त कणखर व सक्षम असला पाहिजे. आजच्या घडीला असे नेतृत्व लाभल्याचे दिसून येते. केवळ पदासाठी एकत्र येणाºया राजकीय पक्षांना दूर सारण्याची गरज आहे. त्यामुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोणीही असो, सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची हीच वेळ असून, मतदानाच्या माध्यमातून शक्य असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. मागील पाच वर्षांच्या कालावधीत केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात कामे केली. आजपर्यंत इतर राजकीय पक्षांना वारंवार संधी देण्यात आली. त्याचे परिणामही दिसून आले. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा मोदी यांच्या पारड्यात मतांचे दान देणार असल्याचे मत प्रणय भुईभार यांनी व्यक्त केले. वंशपरंपरेला फाटा देऊन सुशिक्षित तरुणांना निवडून देण्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले. संजीवनी सांगळे यांनी यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्या कामावर समाधानी असल्याचे सांगितले. पाच वर्षानंतर हा उत्सव, मोठा पर्व आहे. मजबूत सरकार देण्यासाठी मतदानासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचा सूरही यावेळी उमटला. भंते विजय किर्ते यांनी एसटी बसच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. जगन मोरे यांनी चीन व पाकिस्तानच्या धोरणांवर सडकून टीका केली. या दोन्ही देशांना धडा शिकवण्यासाठी मोदींची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या!
देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली, तरी आजपर्यंत केंद्र अथवा राज्यातील कोण्याही पक्षाच्या सरकारने ठोस धोरण आखले नसल्याचे मत पातूर येथील संदीप उगले यांनी व्यक्त केले. शेतमालाला हमीभाव देणारी यंत्रणा उभारण्याची गरज असून, सिंचनाची शस्रविधा, विद्यस्रत पुरवठा तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी कठोर नियम करणारे सरकार हवे,अशी भावना उगले यांनी व्यक्त केली.

 

Web Title: Modi must; But get rid of corruption! ; Passengers view in akola to patur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.