मूर्तिजापुरात मोदी लाटेवर भाजपची नौका पार

By admin | Published: May 17, 2014 06:36 PM2014-05-17T18:36:07+5:302014-05-17T19:15:23+5:30

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी संजय धोत्रे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचे निकालातून दिसून आले.

Modi stretches across the yacht in the idol of BJP's yacht | मूर्तिजापुरात मोदी लाटेवर भाजपची नौका पार

मूर्तिजापुरात मोदी लाटेवर भाजपची नौका पार

Next

मूर्तिजापूर : संपूर्ण देशात असलेली मोदी लाट अकोला लोकसभा मतदारसंघातही तेवढ्याच ताकदीने चालली आणि याच लाटेवर स्वार होऊन भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांनी विजयाची हॅट्ट्रिक नोंदविताना हा गड राखला. मोदी लाटेचा प्रभाव मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातही दिसून आला. या विधानसभा मतदारसंघात येत असलेल्या मूर्तिजापूर आणि बार्शीटाकळी या दोन तालुक्यातील मतदारांनी संजय धोत्रे यांच्या पारड्यात भरभरून मते टाकल्याचे १६ मे रोजी जाहीर झालेल्या निकालातून दिसून आले. या मतदारसंघातील विद्यमान खासदार हरीश पिंपळे हे भाजपचे असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघात केलेल्या कामांचा फायदा निश्चितच भाजपच्या उमेदवाराला होईल,असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत होत आणि तो खरादेखील ठरला.
वर्ष २००९ मध्ये मूर्तिजापूर मतदारसंघ २० वर्षांसाठी अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला. या आरक्षित मतदारसंघातून २००९ च्या निवडणुकीत भाजपचे हरीश पिंपळे यांनी विजय संपादन केला होता. त्यापूर्वीही या मतदारसंघातून भाजपचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. या मतदारसंघात पूर्वी काँग्रेसचा वरचष्मा होता. त्यानंतर मात्र स्थिती बदलत गेली. या मतदारसंघाच्या ५२ वर्षांच्या कालावधीत सतत २३ वर्षे कब्जा करणार्‍या काँग्रेसला बाजूला सारून १५ वर्षांच्या कालावधीत भाजपने जम बसविणे साधी गोष्ट नाही.
बार्शीटाकळी आणि मूर्तिजापूर या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय धोत्रे यांना ७३१२७ मते मिळाली तर भारिप-बमसंचे प्रकाश आंबेडकर यांच्या पारड्यात ४८०३८ मते पडली. तसेच काँग्रेसचे हिदायत पटेल यांना केवळ ३५२४४ मतांवर समाधान मानावे लागले. वर्ष २००९ मध्ये संजय धोत्रे यांना ४२४९६, प्रकाश आंबेडकर यांना ४५०७६ तर बाबासाहेब धाबेकर यांना ३५१४१ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकींचा तुलनात्मकदृष्ट्या अभ्यास केल्यास काँग्रेसला समान मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांना यावर्षी ३ हजार मते जास्त मिळाली. संजय धोत्रे यांना यावेळेस ३० हजार मते अधिक मिळाली आहेत. विकास कामे, सहकार क्षेत्राशी असलेला दांडगा संपर्क, जातीय समीकरण, स्वपक्षीय स्थानिक आमदार, समर्थक व कार्यकर्त्यांचा गोतवळा या जमेच्या बाजू असलेले संजय धोत्रे संपूर्ण देशात असलेल्या मोदी लाटेवर स्वार होऊन या मतदारसंघातून तरून गेल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Modi stretches across the yacht in the idol of BJP's yacht

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.