२५ वर्षांची बिनविरोध मोहखेड राखणार कायम : तीन ग्रामपंचायती झाल्या होत्या बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:18 AM2020-12-22T04:18:59+5:302020-12-22T04:18:59+5:30
तालुक्यातील मोहखेड ग्रामपंचायत गत २५ वर्षांपासून बिनविरोध होत असल्याने तालुक्यात एक वेगळा आणि विशेष पायंडा पाडला जातो. यावर्षीही ही ...
तालुक्यातील मोहखेड ग्रामपंचायत गत २५ वर्षांपासून बिनविरोध होत असल्याने तालुक्यात एक वेगळा आणि विशेष पायंडा पाडला जातो. यावर्षीही ही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तर कंझरा ग्रामपंचायत २०१५ व हिवरा कोरडे २०१७ मध्ये बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले होते. यावर्षीही या दोन्ही ग्रामपंचायतींची निवडणूक असून, दोन्हीही ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी गावकरी कसा कस लावतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. ८६ पैकी २९ ग्रामपंचायत निवडणुका होऊ घातल्या आहेत. उपरोक्त बिनविरोध ग्रामपंचायतपाठोपाठ सोनोरी (मूर्तिजापूर) येथील नागरिक निवडणूक न घेता निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी बांधणी करीत असल्याची माहिती आहे.
-----------------------
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *मोहखेड बिनविरोध परंपरा
कायम?
-------------------------------गत २५ वर्षांपासून एकदाही निवडणूक न झालेल्या व ७ सदस्य संख्या असलेल्या मोहखेड या गावाने निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील एक आदर्श निर्माण केला आहे. आतापर्यंत या गावात ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्वच्या सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यावर्षी ही परंपरा कायम राखण्यासाठी गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे. यात कितपत यश मिळते, याचे उत्तर सध्यातरी स्पष्ट नाही.
---------------------------
---------------
या २९ ग्रामपंचायतींच्या होणार निवडणुका
----------------------------
पारद, भटोरी, मंगरुळ कांबे, गोरेगाव, लाखपुरी, सिरसो, दुर्गवाडा, सांगवी, टिपटाळा,
हिरपूर, कवठा (खोलापूर),
सोनोरी (बपोरी), बपोरी, कुरूम,
माटोडा, कवठा (सोपीनाथ), धामोरी बु., काली, राजुरा घाटे,
खांदला, धानोरा (पाटेकर), निंभा, विराहित, मोहखेड, कंझरा, अनभोरा, जामठी बु., हातगाव, चिखली,