विनयभंगातील आराेपी डाॅक्टर गजाआड
By सचिन राऊत | Published: September 1, 2023 05:57 PM2023-09-01T17:57:38+5:302023-09-01T17:58:03+5:30
आराेपी अग्रवाल यास न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.
अकोला : शहरातील प्रसीध्द हृदयराेग तज्ज्ञ डॉक्टर एस एम अग्रवाल यांच्यावर एका युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री रामदास पेठ पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर शुक्रवारी त्यांना अटक करण्यात आली. आराेपी अग्रवाल यास न्यायालयासमाेर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन काेठडी सुनावली आहे.
अमरावती जिल्ह्यातील वलगाव परिसरातील रहिवासी असलेली एक वीस वर्षेीय युवतीला पाेटाचा त्रास झाल्याने उपचारासाठी अकाेल्यात आली हाेती़ रक्षाबंधनाचा कार्यक्रम आटाेपल्यानंतर या मुलीने डॉ एस एम अग्रवाल यांच्याकडे तपासणीसाठी नंबर लावला. सायंकाळी डॉ अग्रवालने तपासणी केली असता किडनी स्टोनचा आजार असल्याचे प्राथमीक तपासात समाेर आले.
या दरम्यान आणखी तपासणी करावी लागणार असल्याचे सांगत डॉ एस एम अग्रवाल यांनी युवतीला केबिनमध्ये तपासणीसाठी बोलावल्यानंतर तिचा विनयभंग केल्याची तक्रार युवतीने रामदास पेठ पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून तसेच घटनास्थळ पंचनामा केल्यानंतर गुरुवारी रात्री विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पाेलिसांनी शुक्रवारी आराेपी डॉ अग्रवाल यास अटक केली असून त्याला न्यायालयासमाेर हजर केले. न्यायालयाने आराेपीस न्यायालयीन काेठडी सुनावली.