शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By admin | Published: September 28, 2016 01:58 AM2016-09-28T01:58:52+5:302016-09-28T01:58:52+5:30

अकोला जिल्ह्यातील सायखेड येथील घटना.

Molestation of teacher from teacher of Tukting class | शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

शिकवणी वर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Next

सायखेड(जि. अकोला), दि. २७- खासगी शिकवणी वर्गाकरिता आलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी बाश्रीटाकळी शहरात घडली. या प्रकरणात शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी शिकवणी वर्गाचा शिक्षक गोपाल गणपत करंजकर याने शिकवणीसाठी आलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला राहत्या घरातील किचनमध्ये पाठवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केला. इतकेच नव्हे, तर हा प्रकार कुणाला सांगितल्यास बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयामध्ये २0 गुण देण्याचा अधिकार हा शाळेला असतो, ते तुला मिळू देणार नाहीत, अशी धमकीसुद्धा या शिक्षकाने दिली. हा प्रकार २७ सप्टेंबरला घडला. पीडितेच्या फिर्यादीवरून बाश्रीटाकळी पो.स्टे. मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकास अटक केली आहे. पुढील तपास पीएसआय संजय कोरचे, पोहेकाँ. संतोष वाघमारे, संजय सोनोने करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महिला व मुलींच्या विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: Molestation of teacher from teacher of Tukting class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.