चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीचा विनयभंग
By admin | Published: July 24, 2015 11:47 PM2015-07-24T23:47:15+5:302015-07-24T23:47:15+5:30
अनेक वर्षांंपासून होत आहे विनयभंग ; रामदासपेठ पोलीसांत गुन्हा दाखल.
अकोला : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरातील एका ११ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती लहानपणापासून तिच्या काकांकडे राहते. वडील अपंग असून, आई बालपणीच मरण पावली. त्यामुळे तिच्या एकटेपणाचा फायदा घेऊन तिचा चुलतभाऊ रूपेश खरात (२८) हा तिच्याशी लगट करतो. तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करतो. आरोपी हा विवाहित आहे. हा प्रकार अनेक वर्षांंपासून सुरू असून, आरोपीने याची वाच्यता न करण्याची धमकी दिल्यामुळे पीडित मुलगी गप्प बसली. परंतु तिने ही बाब गुरूवारी तिच्या वर्ग शिक्षिकेला सांगितली. शिक्षिकेने तिला धीर देत, पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. गुरुवारी दुपारी पीडित मुलीने रामदासपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीनुसार, रामदासपेठ पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (अ) (८), (१0) आणि बाल लैंगिक संरक्षण कायदा (पॉस्को) नुसार गुन्हा दाखल केला.