मनपाच्या ‘फैजान’कडून आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:25 AM2017-08-12T02:25:07+5:302017-08-12T02:25:13+5:30
अकोला : महापालिकेतील नगररचना विभाग, जलप्रदाय विभाग, बांधकाम विभागातील कामकाज सुरळीत चालावे, यासाठी प्रशासनाने तांत्रिक संवर्गासाठी कंत्राटी तत्त्वावर अभियंत्यांची नियुक्ती केली. एका कंपनीच्या माध्यमातून महापालिकेत दाखल झालेल्या ‘फैजान’ने अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत उत्तर झोनमधील मालमत्ताधारकांच्या नाकीनऊ आणल्याची माहिती समोर आली आहे. इमारतीचे अनधिकृत बांधकाम असल्याच्या सबबीखाली अकोलेकरांची आर्थिक लूट चालवल्याची बाब प्रशासनाने गंभीरतेने घेतली असून, सदर कंत्राटी कर्मचार्याची हकालपट्टी करण्याचे संके त दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

महापालिका म्हणजे भ्रष्ट कामकाजाचे कुरण, असा आजपर्यंतचा समज होता. मनमानी पद्धतीने कामकाज करायचे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार आता इतिहासजमा झाले आहेत. तरी सुद्धा मनपात कंत्राटी पद्धतीवर कामकाज करणार्या काही नवख्या कर्मचार्यांचे हात अद्यापही शिवशिवत असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या नगररचना, जलप्रदाय, बांधकाम, विद्युत आदी विभागांमध्ये तांत्रिक संवर्गातील कर्मचार्यांचा अभाव असल्याचे लक्षात घेऊन आयुक्त अजय लहाने यांनी तांत्रिक संवर्गासाठी कर्मचार्यांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. कर्मचार्यांना मानधनावर नियुक्त केल्यास ते भविष्यात सेवेत कायम करण्याचा दावा करतात, ही बाब पाहता एका खासगी कंपनीच्या माध्यमातून ‘आउट सोर्सिंग’द्वारे कर्मचार्यांची नियुक्ती केली. तीन महिन्यांपासून सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक उत्तर झोनमध्ये नियुक्त केलेल्या ‘फैजान’ने इमारती अनधिकृत असल्याची बतावणी करीत मालमत्ताधारकांजवळून पैसे उकळण्याचे काम सुरू केल्याचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आला आहे. प्रशासनाचा कर्मचारी असल्यामुळे नागरिकांनी कारवाईच्या भीतीपोटी आर्थिक व्यवहार पार पाडले.
नगरसेविका पतीची संगत भोवली!
उत्तर झोनमधील एका नगरसेविकेच्या पतीने सदर कर्मचार्याला हा ताशी धरून मालमत्ताधारकांना धमकावण्याचे प्रकार केले.
हा प्रकार काही व्यावसायिक, रहिवाशांनी दुसर्या एका नगरसेविकेच्या पतीसमोर कथन केला.
मालमत्ता दाखवणारा नगरसेविका पती आणि सदर कर्मचार्याची ऐशीतैशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
अतिरिक्त आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
अकोलेकरांची आर्थिक लूट करणार्या कं त्राटी कर्मचार्याचा अहवाल उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी जी.एम. पांडे यांनी अतिरिक्त आयुक्त दीपक पाटील यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. या प्रकरणी दीपक पाटील काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.