३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करता येईल अखर्चित निधी!

By admin | Published: April 6, 2015 01:58 AM2015-04-06T01:58:16+5:302015-04-06T01:58:16+5:30

तेराव्या वित्त आयोगातील निधी; १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिका-यावर.

Money can be spent till September 30! | ३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करता येईल अखर्चित निधी!

३0 सप्टेंबरपर्यंत खर्च करता येईल अखर्चित निधी!

Next

वाशिम : पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी तेराव्या वित्त आयोगातून मिळालेला, परंतु ३१ मार्चनंतर अखर्चित राहिलेला निधी आता ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत खर्च करता येणार आहे. तशी मान्यता राज्याच्या ग्रामविकास खात्याने १ एप्रिल रोजी दिली. तेराव्या वित्त आयोगांतर्गत पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर निधी दिला जातो. हा निधी खर्च करण्याची मुदत ३१ मार्च २0१५ पर्यंत होती. तेराव्या वित्त आयोगाअंतर्गत वितरीत निधीतून झालेल्या खर्चाचा शासनस्तरावर आढावा घेतला असता, आतापर्यंत वितरीत केलेल्या निधीतील रक्कम व या वितरीत केलेल्या निधीवर प्राप्त व्याजाची काही रक्कम अखर्चीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणाला ब्रेक लागू नये, यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने अखर्चित निधी खर्च करण्यास ३0 सप्टेंबर २0१५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. १00 टक्के निधी खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Web Title: Money can be spent till September 30!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.