पीक विम्याचे पैसे नेट बँकींगद्वारे काढले
By admin | Published: October 7, 2015 11:32 PM2015-10-07T23:32:52+5:302015-10-07T23:32:52+5:30
निनावी फोन करून फसवणूक अल्पभूधारक शेतक-याची फसवणूक; बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री येथील घटना.
उंद्री ( जि. बुलडाणा): निनावी फोन करून माहितीच्या आधारे नेट बँकींगद्वारे अल्पभूधारक शेतकर्याच्या खात्यातून पैसे काढून घेतल्याची घटना २ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी संबंधित शेतकर्याने तक्रार केली आहे. उंद्री येथील रहिवासी शे.एजाज शे.चांद (वय ३८ वर्षे) यांची डासाळा शिवारात तीन एकर शेती आहे. गत वर्षीच्या पीक विम्याचे पैसे त्यांच्या स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत क्र. ३३१८७७७९0७६ या खात्यात २ ऑक्टोबर रोजी ३४६६ रु. अधिक १६0८ रु. असे एकूण ५0७४ रु. शासनाकडून जमा झाले होते व आधीचे खात्यात २४६७ रु. होते, असे त्यांच्या खात्यात एकूण ७५४१ रु. जमा होते. या शेतकर्याला सहा महिन्यांपूर्वी एक निनावी फोन येवून त्याने म्हटले, ह्यमी बँक मॅनेजर बोलतो, मला तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती द्या, अन्यथा तुमचे बँक खाते बंद होईल.ह्ण म्हणून शेतकर्याने संपूर्ण माहिती दिली. २ ऑक्टोबरला जेव्हा पैसे जमा झाले तेव्हा अज्ञात भामट्याने नेट बँकींगच्या माध्यमातून आधी २00 रुपये, नंतर ३ ऑक्टोबरला २000 रु. पुढे २000 रु. व लगेच ३000 रु. असे एकूण ७२00 रुपये ट्रान्सफर केले. याबाबत मॅसेज संबंधित शेतकर्याच्या मोबाइलवर येताच संबंधित शेतकर्याने उंद्री येथील स्टेट बँकेत जाऊन पासबुकात नोंद करून घेतली. त्यात पीक विम्याची रक्कम लंपास झाल्याचे आढळून आले. दोन-तीन घटना उंद्री परिसरामध्ये घडल्या आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.