अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 08:53 PM2018-01-25T20:53:36+5:302018-01-25T20:57:58+5:30

अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २७ जानेवारीला सकाळी ठीक ८ वाजता पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे.

Monorail Cleanliness campaign again in Akola | अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम!

अकोल्यात शनिवारी पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम!

Next
ठळक मुद्देसकाळी आठ वाजता होणार प्रारंभनदीकाठी येण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी १३ व २0 जानेवारी रोजी सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकसहभागातून नदीतील कचरा व जलकुंभी मोठय़ा प्रमाणात बाहेर काढण्यात आली; मात्र नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत स्वच्छतेची ही मोहीम सुरूच राहणार असल्याने शनिवार, २७ जानेवारीला सकाळी ठीक ८ वाजता पुन्हा मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. नदीकाठच्या निमवाडी येथील लक्झरी बस स्टँडचा परिसर व नदीकाठच्या गीता नगर येथे सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले आहे.
नदीच्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेबरोबरच स्वच्छतेअंतर्गत करावयाच्या बाबींचे परिपूर्ण नियोजन जिल्हा व मनपा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेसाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. कोणालाही दुखापत होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणालाही प्रत्यक्ष नदीच्या आत जाऊन स्वच्छता करावी लागणार नाही, त्यासाठी अनुभवी कामगारांचे साहाय्य घेतले जाणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेने स्वच्छता करावी. स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्वांनी सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
 अकोल्याचे वैभव असणारी मोर्णा नदी जलकुंभी व कचर्‍याने विद्रुप झाल्याने तिच्या स्वच्छतेसाठी जिल्हाधिकार्‍यांनी लोकसहभागातून नदीची स्वच्छता करण्याचे निश्‍चित केल्यानंतर अनेक सामाजिक संस्था, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिकांनी ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविले. दि. १३ व २0 जानेवारी रोजी प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह हजारो लोक सहभागी होऊन नदीच्या स्वच्छतेत सहभाग घेतला. मोहिमेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या मोहिमेमुळे नदीचे रूप पालटून गेले असून, नदी आता वाहताना दिसत आहे. 
नदीची स्वच्छता अद्याप बाकी असल्याने २७ जानेवारी रोजी पुन्हा एकदा नागरिकांनी स्वच्छता मोहिमेकरिता योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. दर शनिवारी लोकसहभागातून नदी स्वच्छ केली जाईल. नदी पूर्णत: स्वच्छ होईपर्यंत स्वच्छता मोहीम सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Monorail Cleanliness campaign again in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.