दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस!

By admin | Published: May 26, 2014 12:31 AM2014-05-26T00:31:51+5:302014-05-26T01:14:36+5:30

येत्या दोन-तीन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस !

Monsoon rain in two days! | दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस!

दोन दिवसांत मान्सूनपूर्व पाऊस!

Next

अकोला : येत्या दोन-तीन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पाऊस होणार आहे, असा अंदाज पुणे हवामन शास्त्रज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी रविवारी ह्यलोकमतह्णशी बोलताना व्यक्त केला. वातावरणातील बदलामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे सोमवार, मंगळवार किंवा बुधवार या तीन दिवसांत विदर्भ आणि मराठवाडा या भागात मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावर्षीच्या पावसाळ्यात अकोला जिल्ह्यात सरासरीएवढा म्हणजेच १00 टक्के पाऊस होणार असून, नागपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त अर्थात १0२ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १00 टक्के, परभणीसह मराठवाड्यात १00 टक्के आणि कोकण विभागात ९७ टक्के पाऊस होणार असल्याची शक्यतादेखील डॉ.साबळे यांनी व्यक्त केली.

Web Title: Monsoon rain in two days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.