‘मान्सून’ परतीचे लागले वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 02:02 AM2017-09-26T02:02:46+5:302017-09-26T02:03:05+5:30

अकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. 

'Monsoon' returns to watch! | ‘मान्सून’ परतीचे लागले वेध!

‘मान्सून’ परतीचे लागले वेध!

Next
ठळक मुद्दे३0 सप्टेंबरपर्यंत मान्सूनविदर्भातील १0 ऑक्टोबरपर्यंत होईल चित्र स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला :  परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. 
विदर्भात यावर्षी सरासरी २२ टक्के पावसाची तूट आहे. २0 टक्के तूट ही सामान्य असल्याने येत्या ३0 सप्टेंबरपर्यंत पाऊस आल्यास ही तूट भरू न निघण्याची शक्यता आहे; परंतु सार्वत्रिक पावसाचे आता कोणतेही चिन्हं नसून, तुरळक एखाद्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात पावसाळ्य़ात जो पाऊस झाला, त्याचे स्वरू प सार्वत्रिक नव्हतेच. त्यामुळे धरणामंध्ये अपेक्षित जलसाठा संचयित झाला नाही. 
सोमवारी पश्‍चिम उत्तर प्रदेश व लगतच्या भागावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरू न गेले  आहे. गेल्या चोवीस तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसेच कोकण-गोव्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात आता पावसाचे कोणतेही संकेत नाहीत. दरम्यान, ३0 सप्टेंबरपर्यंत पडणारा पाऊसच मान्सूनच्या पावसामध्ये समाविष्ट करता येतो. त्यानंतर येणार्‍या पावसाची गणना ही अवकाळी पावसात केली जाते. 
दरम्यान, यावर्षी पूरक पाऊस नसल्याने विदर्भातील भूगर्भातील जलसाठय़ात वाढ झाली नसून, धरणातही पूरक जलसाठा नाही. तसेच ३0 सप्टेंबरपर्यंत सार्वत्रिक दमदार पावसाचे कोणतेही संकेत नसल्याने यावर्षी धरणांतील र्मयादित साठय़ाचे काळजीपूवर्क नियोजन करणे क्रमप्राप्त आहे.

राजस्थानमध्ये परतीच्या पावसाला पूरक परिस्थिती निर्माण झाली असून, येत्या दोन दिवसांत तो परतीला निघण्याची शक्यता आहे. ३0 सप्टेंबरपर्यंत विदर्भात सामान्य पावसाळा असतो, त्यानंतर परतीला निघतो. यावर्षी तो १0 ऑक्टोबरनंतर परतीला निघण्याची शक्यता आहे. विदर्भातील हवामान सध्या कोरडे आहे. त्यामुळे येत्या तीन-चार दिवस पावसाची शक्यता नाही.
- ए.डी. ताठे,विभागीय संचालक, हवामानशास्त्र,
विदर्भ, मध्य प्रदेश, छत्तीसगड,नागपूर.

Web Title: 'Monsoon' returns to watch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.