यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2017 01:41 AM2017-07-15T01:41:21+5:302017-07-15T01:41:21+5:30

एवढे कसे बदल झाले हो : हवामान विभागाच्या अंदाजावर शेतकऱ्यांचा प्रश्न

Monsoon rocks this year! | यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

यावर्षीही चुकले मान्सूनचे ठोकताळे!

Next

राजरत्न सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविले होते. या अंदाजाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत कृषी निविष्ठा खरेदी केली; पण हे अंदाज सफशेल चुकल्याने शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळेच एवढे अंदाज चुकतात कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून, ही जबाबदारी कोण स्वीकारण, या प्रश्नाचेही शेतक ऱ्यांना उत्तर हवे आहे.
या सर्व अंदाजामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी म्हणतो, विश्वास ठेवावा कोणावर, हवामान खात्यांची यंत्रणा एवढी कशी चुकू शकते की चुकविली, असेही प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहेत.
हवामान खात्यांचा एवढा मोेठा अंदाज जर चुकत असेल, तर ही यंत्रणा काय कामाची, असा सवाल शेतकरी करीत आहे.

अलीकडच्या काही वर्षात अंदाज चुकले!
देशातील, राज्यातील शेतकरी ‘ई-शेती‘ची कास धरीत आहेत. अनेक गावांत संगणक प्रणाली लावण्यात आली आहे. शेतकरी समूह गट तयार झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत. या पृष्ठभूमीवर अनेक ठिकाणी संगणक प्रणालीवर समूहाने मान्सून पावसाचा अंदाज बघतात, आता सुशिक्षित आधुनिक शेती करतानाचे चित्र आहे. यांत्रिकीकरणाचा प्रभाव वाढला आहे. कृषी अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी शेती करीत असून, अनेक यशोगाथा राज्यात आहेत. अशाच शेकडो शेतकऱ्यांना शासनाने विविध नावाने पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. एकीकडे शेतकरी आधुनिक, नवतंत्रज्ञान वापरू न शेती करीत असताना, आधुनिक तंत्रज्ञान असलेले हवामान खाते अंदाज चुकवत असल्याने आता शेती करणेच कठीण झाल्याने खिन्न मनाने युवा, शिकलेला शेतकरी सांगताना दिसतो आहे.

पावसाचे अंदाज चुकल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड अािर्थक नुकसान झाले आहे. शेतकरी भरडल्या गेला आहे. याची जबादारी शासनाने स्वीकारू न शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.
- मनोज तायडे,
अध्यक्ष ,शेतकरी जागर मंच, अकोला.

Web Title: Monsoon rocks this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.