मान्सुन पुर्व कपाशी लागवड सुरु
By admin | Published: May 22, 2017 07:54 PM2017-05-22T19:54:54+5:302017-05-22T19:54:54+5:30
तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती पट्टा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड तापमान असतानांही मान्सुन पुर्व कपाशीची लागवड करुन एक प्रकारे कपाशीचा जुगार खेळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा तालुका हा बागायती पट्टा असल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड तापमान असतानांही मान्सुन पुर्व कपाशीची लागवड करुन एक प्रकारे कपाशीचा जुगार खेळला आहे.
तालुक्यात बागायती शेतकऱ्यांची संख््या जास्त आहे. त्यात सध्या हरबरा,उडीद, कांदा, सोयाबीन आदि पिकाला भाव नाहीत. त्यात कर्जाचा डोंगर डोक्यावर असतानाही कशाचीही पर्वा न करता तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी प्रचंड तापमान असतानाही मान्सुन पुर्व कपाशीचे बियाणे जादा भावान खरेदी करुन कपाशी लागवड सुरु केली आहे. उत्पन्नाची पर्वा न करता मोठ्या हिंमतीने बँकेचे कर्ज, खासगी कर्ज व घरातील मुला-मुलींचे लग्नासाठी पैसा उपलब्ध व्हावा म्हणून बागायतदार शेतकऱ्यांनी एक प्रकारे मान्सुन पुर्व कपाशीची लागवड करुन कपाशीचा जुगारच खेळला आहे.