महिनाभरात चौघांच्या मृत्यूनंतरही यंत्रणा झोपेत

By admin | Published: September 13, 2014 01:10 AM2014-09-13T01:10:18+5:302014-09-13T01:10:18+5:30

डेंग्यूच्या नियंत्रणासाठी अकोला आरोग्य विभागाकडून उपाययोजना शून्य

In a month after the death of four, the machinery sleeping | महिनाभरात चौघांच्या मृत्यूनंतरही यंत्रणा झोपेत

महिनाभरात चौघांच्या मृत्यूनंतरही यंत्रणा झोपेत

Next

अकोला - वातावरणातील बदलामुळे जिल्हय़ात डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचा उद्रेक झाला असून, गत एक महिन्याच्या कालावधीत जिल्हय़ातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण जिल्हा डेंग्यूसदृश तापाच्या विळख्यात असतानाही आरोग्य विभागाकडून मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नसल्याचे वास्तव आहे. पावसाळय़ातील पाण्यामुळे प्रचंड साचलेली घाण आणि डबक्यांमधील पाण्यामध्ये डासांची मोठय़ा प्रमाणात होत असलेली उत्पत्ती डेंग्यू व डेंग्यूसदृश तापाचे सर्वात मोठे कारण असल्याची माहिती आहे. गत काही दिवसांपासून जिल्हय़ात पसरलेली डेंग्यूसदृश तापाची साथ अद्यापही कायम असून, गत एक महिन्याच्या कालावधीत या आजाराने जिल्हय़ातील चौघांचा बळी घेतला आहे. डेंग्यूच्या आजारावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचा आरोग्य डेंग्यूसदृश तापाची लागण झालेल्या गावातील नागरिकांनी केला आहे. डेंग्यूसदृश तापाच्या या व्हायरलमुळे नेमका कशाप्रकारे औषधोपचार करावा, याबाबत डॉक्टरही संभ्रमात पडले असून, यावर आरोग्य विभागाने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्यलोकम तह्णशी बोलताना दिली. संततधार पाऊस आणि तळपत्या उन्हामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली असून, रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे.

Web Title: In a month after the death of four, the machinery sleeping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.