श्रावण महिन्यापुर्वी कावड मार्गाचे कॉंक्रीटीकरण करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 03:42 PM2019-07-10T15:42:07+5:302019-07-10T15:42:12+5:30
दीकरणासाठी अकोट-अकोला मार्गाचा पाचमोरी ते गांधीग्रामपर्यंतचा टप्पा खोदून ठेवल्याने गत दोन वर्षांपासून कावडधारी शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे.
अकोला: श्रावण महिन्यात गांधीग्राम येथील पूर्र्णा नदीच्या जलाने राज राजेशवराला जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. रुंदीकरणासाठी अकोट-अकोला मार्गाचा पाचमोरी ते गांधीग्रामपर्यंतचा टप्पा खोदून ठेवल्याने गत दोन वर्षांपासून कावडधारी शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत आहे. श्रावण महिन्यातील कावड उत्सवापूर्वी या मार्गाचे काँक्रिटीकरण पूर्ण करा, मागणीचे निवेदन, प्रदेश कॉंग्रेस महासचिव मदन भरगड यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंतांना बुधवारी देण्यात आले. मागणी पूर्ण न झाल्यासा राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयास कुलुप ठोकू, असा इशाराही यावेही मदन भरगड यांनी दिला.
शिवभक्तांनी यापूर्वीही या मार्गाच्या कॉंक्रीटीकरण करणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. लेखी आश्वासना नंतरही या मागार्चे कार्य आजपर्यंत पुर्ण झालेले नाही. शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पिवळे पट्टे मारण्याच्या मागणीसाठी एक वर्ष आधी निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी प्रशासनातर्फे पिवळे पट्टे आखण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र अद्यापही आश्वासनाची पुर्तता न झाल्याने कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा पिवळे पट्टे मारण्यात यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंतांना निवेदन देण्यात आले. साजीद पठान ( विरोधी पक्ष नेता मनपा),सुरेश शर्मा (मामा), सौ.पुष्पा देशमुख(महिला अध्यक्ष), विजय शर्मा ,वर्षा बडगुजर, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, संदीप ठाकुर, राम ठाकुर, ऋशीकेष काळे, शुभम ठाकुर, सतीश खरारे, अप्पु सिंह, शक्ती पुरोहित, आकाश सिरसाट, सैय्यद यासीन (बब्बु भाई), हरीष कटारीया, राजेश पाटील, रफीक लखानी, रफीउल्ला खान ( गौसु ), महेंद्र गवई, शेख बबलू, जयश्रीताई दुबे, मोहम्मद रशीद शेख बिस्मील्ला, पप्पु खान, मनीष नारायणे, देविदास सोनोने, जावेद खान, भगवान बोयत, कुंदन गुप्ता, विकास डोंगरे, असलम खान व अनेक शिवभक्त, कार्यकर्ते उपस्थित होते.