आज मध्यरात्री चंद्र तीन तास पृथ्वीच्या छायेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:08 PM2019-07-16T12:08:57+5:302019-07-16T12:13:20+5:30
अकोला: चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत येत असल्यामुळे आपल्या चंद्राचा काही भाग पाहता येणार नाही.
अकोला: चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत येत असल्यामुळे आपल्या चंद्राचा काही भाग पाहता येणार नाही. हा योग १६ जुलै रोजीच्या मध्यरात्री घडून येणार आहे. अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.
ग्रहण म्हणजे निसर्गातील सावल्यांचा खेळ आहे. चंद्र हा तीन तास पृथ्वीच्या सावलीत असल्यामुळे आकाशप्रेमींना ही निरीक्षणाची एक संधी आहे. १६ जुलै रोजी रात्री १.३१ वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होणार आहे. ३ वाजता ग्रहण मध्य आहे तर पहाटे ४.३0 वाजता चंद्र पूर्णपणे मोकळा झालेला दिसणार आहे. चंद्रग्रहणाबाबत असलेले गैरसमज बाजूला सारून व परंपरागत भ्रम न बाळगता, या ग्रहणाचा आनंद घ्यावा. हे ग्रहण भारतासह आॅस्ट्रेलिया, आफ्रिका व दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. हा नयनरम्य आकाश नजारा सर्वांनी बघावा, असे विश्वभारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी कळविले. (प्रतिनिधी)