मूग, उडीद पेरणीची वेळ संपली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 03:04 PM2018-07-07T15:04:20+5:302018-07-07T15:06:13+5:30

अकोला :   अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा, शेगाव, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिला आहे.

 Moong, Udad sowing time is over! | मूग, उडीद पेरणीची वेळ संपली!

मूग, उडीद पेरणीची वेळ संपली!

Next
ठळक मुद्देमूग,उडीद पेरणीची वेळ संपल्याने आता या पिकांची पेरणी करू नये, करायचीच असल्यास आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.या पिकांचे कृषी हवामान केंद्राने केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.


अकोला :   अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा, शेगाव, संग्रामपूर व खामगाव तालुक्यात अपुरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी हवामान केंद्राने दिला आहे. मूग,उडीद पेरणीची वेळ संपल्याने आता या पिकांची पेरणी करू नये, करायचीच असल्यास आंतरपीक म्हणून पेरणी करता येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
पावसाळ््याचा एक महिना उलटला असून, अकोला, बुलडाणा जिल्ह्यातील या चार तालुक्यात अद्याप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. इतर जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी हा पाऊस एक दोन दिवसच बºयापैकी पडला असून, त्याचा वेग जास्त असल्याने वाहून गेला. असे असले तरी बहुतेक ठिकाणी कपाशीची पेरणी आटोपली आहे. पीक उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहेत. या पिकांचे कृषी हवामान केंद्राने केलेल्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.
- विदर्भात पुढील ४८ तासात जोरदार पावसाची शक्यता!
विदर्भात पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तसेच ७ व ८ जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिजोरदार, ९ जुलै रोजी तुरळक, काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही हवामान केंद्राने वर्तविली.

 

Web Title:  Moong, Udad sowing time is over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.