आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेधार्थ मोर्चा
By Admin | Published: June 29, 2016 02:03 AM2016-06-29T02:03:48+5:302016-06-29T02:03:48+5:30
आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला.
अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली बुद्ध भूषण प्रेस व आंबेडकर भवन उद्ध्वस्त करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मंगळवारी निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन भवन उद्ध्वस्त करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. विकास सामाजिक संघटनेचे दीपक निकाळजे, जिल्हाध्यक्ष आकाश इंगळे, आक्रमण संघटनेचे सागर खंडारे, उल्हास सरदार, युवा गर्जना संघटनेचे श्रीकांत पाटील, पहेलवान ग्रुपचे बिट्ट वाकोडे, प्रशिक पळसपगार, सम्यक बुद्ध संघाचे सुगन तायडे, अक्षय भगत, अँड. अमोल सिरसाट, बी.के. एम.एम. संघाचे किरण शिरसाट, अश्वीन शिरसाट आदींनी सहभाग घेतला. अशोक वाटिकेपासून निघालेला हा मोर्चा मुंबई येथील घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांना विविध संघटनेच्यावतीने निवेदन सोपविण्यात आले.