आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By Admin | Published: July 9, 2017 08:16 PM2017-07-09T20:16:52+5:302017-07-09T20:16:52+5:30

अकोला : भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून दगडफेकीचा प्रयत्न झाला. या भ्याड हल्ल्याचा भारिप-बमसंच्यावतीने रविवारी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

The morcha was condemned by the attack on Ambedkar | आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

आंबेडकर यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महू येथील कार्यक्रमादरम्यान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून काळे झेंडे दाखविण्यासोबतच दगडफेकीचा प्रयत्न झाला. या भ्याड हल्ल्याचा भारिप-बमसंच्यावतीने रविवारी मोर्चा काढून निषेध करण्यात आला. दोषींवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
देशात लोकशाही आहे. सध्या देशात भारतीय जनता पक्षाकडून विविध षडयंत्रे केली जात आहेत. त्या षडयंत्र करणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या सत्तेकडून पाठबळ दिले जात आहे. त्यामुळे महू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीला भेट देण्यासाठी गेलेले त्यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची गाडी अडवून दगडफेकीचा प्रयत्न झाला. हा प्रकार बौद्ध धर्माची अवहेलना करण्यासारखा आहे. भाजप काळात स्मारक होत असले, तरी ते काही विशिष्ट संघटनांनी काबीज केले आहे, त्यामुळे तेथे काहींची मक्तेदारी तयार होत आहे. त्या ठिकाणी भेट दिली असता हा भ्याड हल्ला झाला आहे. असे प्रकार सुरू राहिल्यास तमाम बौद्ध जनतेसह महू येथे धडक दिली जाणार आहे. लोकशाहीची पायमल्ली करणाऱ्यांना भाजप सत्तेकडून पाठबळ दिले जात आहे, त्यामुळे शासनाचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. अ‍ॅड. आंबेडकर यांना स्वतंत्र सुरक्षा देण्यात यावी, दोषींवर त्वरित कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बळीराम सिरस्कार, डी.एन. खंडारे, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमिरउल्लाखा पठाण, सभापती रेखा अंभोरे, दामोदर जगताप, अशोक सिरसाट, वंदना वासनिक, गजानन गवई, महानगर अध्यक्ष बुद्धरत्न इंगोले, सिद्धार्थ सिरसाट, प्रभाताई सिरसाट, विकास सदांशिव, जीवन डिगे, संगीता खंडारे, पुरुषोत्तम वानखडे, कोकिळा वाहुरवाघ, किशोर तेलगोटे, मंतोष मोहोड, सुनीता गजघाटे, रामा तायडे, प्रा. संजय हिवराळे, दिनकर वाघ, श्यामराव वाहुरवाघ, सुभाष रौंदळे, संजय मुळे, शे.साबीर शे.मुसा, आसिफखान, शंकरराव इंगळे, दिलीप माहोड, विजय चक्रे, अशोक दारोकार, देवानंद खडे, नितीन प्रधान, दिनेश मानकर, सोनू गायकवाड, मिलिंद आकोडे व अनुराधा ठाकरे (दोड) उपस्थित होते.

Web Title: The morcha was condemned by the attack on Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.