आचारसंहिता भंगाचे राज्यात ३५0 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

By admin | Published: October 12, 2014 11:37 PM2014-10-12T23:37:18+5:302014-10-13T00:46:13+5:30

पश्‍चिम व-हाडात ८५ तक्रारी, ७९ गुन्हे दाखल.

More than 350 cases of violation of Code of Conduct violate state | आचारसंहिता भंगाचे राज्यात ३५0 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

आचारसंहिता भंगाचे राज्यात ३५0 पेक्षा जास्त गुन्हे दाखल

Next

ब्रम्हानंद जाधव/मेहकर
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून, आचारसंहिता भंगाच्या राज्यभरात सुमारे ३५0 पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील एकूण १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये ८५ तक्रारी दाखल झाल्या असून, ७९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम या तीन जिल्ह्यात एकूण १५ विधानसभा म तदारसंघ आहेत. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली; तेव्हापासून राज्यभरात आचारसंहिता भंगाच्या ३५0 पेक्षा जास्त तक्रारी दाखल करण्यात आल्या. आचारसंहितेचा भंग कुठे होत आहे का, यावर निवडणूक आयोगाची करडी नजर असून, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी तत्काळ नोंदवून कारवाई केली जात आहे.
पश्‍चिम वर्‍हाडातील केवळ १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये आचारसंहिता भंगाच्या ८५ तक्रारी दाखल असून, त्यापैकी ७९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक ४३ गुन्हे अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहेत. अकोला जिल्ह्यात ५ विधानसभा मतदारसंघ असून, आचारसंहिता भंगाच्या ४३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात ३ विधानसभा मतदारसंघ असून, आचारसंहिता भंगाचे ३१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ७ विधानसभा मतदारसंघ असून, येथे ११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता भंगाचे सर्वात कमी ५ गुन्हे बुलडाणा जिल्ह्यात दाखल करण्यात आले आहेत.

*आचारसंहितेचा भंग
जिल्हा                            मतदारसंघ                  गुन्हे
बुलडाणा                              ७                               ५
अकोला                               ५                              ४३
वाशिम                                ३                              ३१
एकूण                                १५                              ७९

Web Title: More than 350 cases of violation of Code of Conduct violate state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.