लाचखोर उपनिबंधकाविरोधात ५० पेक्षा अधिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 10:42 AM2020-07-13T10:42:42+5:302020-07-13T10:42:53+5:30
लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याच्याविरुद्ध आता तक्रारींचा ओघ सुरू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सहकार विभागाचा लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याने त्याचा लाचखोर साथीदार तसेच विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी याच्यामार्फत गुरुवार २ जुलै रोजी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्याकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर हे दोघे पोलीस कोठडीत आहेत. अशातच लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याच्याविरुद्ध आता तक्रारींचा ओघ सुरू झाला. आतापर्यंत त्याच्याविरुद्ध तब्बल ५० पेक्षा अधिक तक्रारी झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तर अनेक व्यापाऱ्यांना अवैध सावकारीत अडकविण्याच्या धमक्याही या दोघांनी दिल्याचे त्यांनी एसीबीसमोर दिलेल्या बयानात आता समोर येत आहे.
सहकार विभागाचा लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे व विक्रीकर विभागाचा सहायक आयुक्त अमरप्रीत सिंग सेठी या दोघांची चौकशी सुरू आहे. त्यांनी जिल्ह्यातील व्यापारी तसेच मोठे व्यवहार असलेल्या अनेकांना अवैध सावकारीत अडकविण्याची धमकी देत रक्कम उकळण्याचा गोरखधंदाच सुरू केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक व्यापारी, नोकरदार, उद्योजक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे याच्याविरुद्ध तक्रारी केल्या आहेत. यासोबतच अनेक व्यापाºयांनी एसीबीमध्ये येऊन त्याच्या विरुद्ध बयान नोंदविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, एसीबीने या दोघांच्या बेहिशेबी तसेच स्थावर आणि इतर मालमत्तांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये या दोघांसह त्यांचे नातेवाईक तसेच कुटुंबातील सदस्य यांच्या नावे असलेल्या संपत्तीचाही शोध घेण्यात येत आहे.
सुटीच्या दिवशी उघडले कार्यालय!
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय शनिवारी सुटीच्या दिवशी उघडून यामधील काही दस्तावेज तसेच लाचखोरीचे काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची शंका घेतली जात आहे. त्यामुळे प्रभारी जिल्हा उपनिबंधक खाडे यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात येणार असल्याची माहिती एसीबीकडून प्राप्त झाली आहे. तत्पूर्वी दोन्ही लाचखोरांना अटक केल्यानंतर त्यांनीही जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाण्यासाठी आटापिटा केला होता; मात्र एसीबीच्या अधिकाºयांनी त्यांना मोकळीक न दिल्याने त्यांनी सुटीच्या दिवशी हे कार्यालय उघडण्यामागे कारण काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नात्यातील अधिकाºयास प्रभार देण्याचा खटाटोप
लाचखोर जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे आणि विक्रीकरचा साहायक आयुक्त अमर सेठी या दोघांना दोन लाखांची लाच घेताना अटक केल्यानंतर त्यांचे हे लाचखोरीचे पाप झाकण्यासाठी अकोला जिल्हा उपनिबंधकपदी त्यांचाच नातेवाईक आणण्यासाठी फिल्डिंग लावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तेवढ्यासाठी कार्यालय उघडून संबंधित अधिकाºयासही या ठिकाणची माहिती देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
नोटांच्या बंडलवर अधिकाºयाचे नाव
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील आणखी एक अधिकारी आता लाचखोरीत वाढण्याची शक्यता आहे. कारण एका-दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या नोटांच्या बंडलवर एका अधिकाºयाचे नाव असल्याने सदर अधिकारीही संशयाच्या घेºयात सापडला आहे. यावरून या कार्यालयात वादग्रस्त कारभाराची परिसीमाच गाठल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. तसेच लोखंडे रुजू झाल्यापासून जप्तीतील रक्कम सुपूर्दनाम्यावर सोडण्यात येत नसल्याची माहिती आहे.
दोन्ही लाचखोर अधिकाºयांची आज पेशी
दोन्ही लाचखोरांची पोलीस कोठडी सोमवारी संपणार असल्याने या दोघांनाही आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या दोघांविरुद्ध तक्रारींचा ओघ वाढता असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत या तक्रारींचे सत्यही समोर येणार असल्याची शक्यता आहे.
सुरुवातीला २२ लाखांची मागणी
अकोट बाजार समितीच्या सचिवासह त्यांच्या अधीनस्त असलेल्या कर्मचाºयांना थकबाकी आणि सातवा वेतन आयोगाची निश्चिती लागू करण्यासाठी या दोघांनी सुरुवातीला सुमारे २२ लाख रुपयांची लाच मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर ही रक्कम कमी करीत १० लाखांवर आली; मात्र तक्रारकर्त्याने केवळ ५ लाख रुपये देणार असल्याचे मान्य केल्यानंतर या दोन्ही अधिकाºयांनी ५ लाखांची लाच घेण्यासाठी गुरुवार दिवस ठरविला आणि लाच स्वीकारताच तसेच दोघांचे फोनवरील संभाषणही पैसे घेतल्याचे झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.