‘सुपर स्पेशालिटी’साठी आणखी अडीच एकर जागा!.
By admin | Published: May 23, 2016 01:44 AM2016-05-23T01:44:54+5:302016-05-23T01:44:54+5:30
लवकरच भूमिपूजन, पालकमंत्र्यांची माहिती.
अकोला: प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत अकोल्यात १५0 कोटी रुपये खचरून १६0 खाटांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला गती आली असून, केंद्रीय बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी हॉस्पिटलसाठी प्रशस्त इमारतीचा आराखडा तयार केला. अडीच एकर जागेत हॉस्पिटल प्रस्तावित होते; परंतु जागा अपुरी पडत असल्याने आणखी अडीच एकर जागा उपलब्ध करून देणार आहे आणि लवकरच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेण्यात येईल. त्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येईल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
केंद्र शासनाने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी दिल्यानंतर निमवाडी परिसरात अडीच एकर जागा उपलब्ध करण्यात आली. केंद्रीय बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी हॉस्पिटलचा जागा आराखडा तयार केल्यानंतर सदर जागा अपुरी पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे आपण १७ मे रोजी जिल्हाधिकार्यांना आणखी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिले. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आणखी अडीच एकर जागा सुपर स्पेशालिटीसाठी उपलब्ध होईल. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाने १२0 कोटी रुपये दिले आहेत, तर राज्य शासनाने ३0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात ८३ कोटी ७२ लाख रुपये खचरून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची प्रशस्त इमारत उभी राहणार असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पाच मजली इमारत उभारली जाईल