सिंचनासाठी सोडले मोर्णा कालव्याचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:43+5:302020-12-30T04:25:43+5:30
मोर्णा प्रकल्पावरून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढलेले आहेत. उजव्या कालव्याचे यापूर्वीच पाणी सोडले आहे. दोन्ही कालव्याच्या खाली ...
मोर्णा प्रकल्पावरून उजवा आणि डावा असे दोन कालवे काढलेले आहेत. उजव्या कालव्याचे यापूर्वीच पाणी सोडले आहे. दोन्ही कालव्याच्या खाली अंदाजे १९५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्यामधून डाव्या कालव्याखाली जवळपास ७०० ते ७५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यावर्षी मोर्णा प्रकल्प हा १०० टक्के भरला असल्यामुळे रब्बीसह उन्हाळी पिकांसाठीही पाणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. भंडारज येथे ८ नंबरचा मायनर असून, सदर पाणी हे कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत देण्यात आले आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पामध्ये पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळे कालव्याखालील अपेक्षित असलेल्या संपूर्ण क्षेत्राला पाणी देण्यात आले आहे. कालव्याला पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, या पाण्यामुळे सदर गावातील पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होणार आहे. अर्थातच उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या भासणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.