मोर्णा स्वच्छता मोहिम : बाराव्या टप्प्याला अकोलेकरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
By atul.jaiswal | Published: March 31, 2018 05:40 PM2018-03-31T17:40:30+5:302018-03-31T17:40:30+5:30
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात शनिवारी माजी सैनिक, विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला.
अकोला: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने सुरू असलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनच्या बाराव्या टप्प्यात शनिवारी माजी सैनिक, विविध संस्थांसह शेकडो लोकांनी सहभाग नोंदविला. गीतानगर परिसरातील मोर्णा नदीच्या काठावर महापौर विजय अग्रवाल, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, बाळापुरचे तहसिलदार दिपक पुंडे, पातूरचे तहसिलदार रामेश्वर पुरी यांच्यासह त्यांचे अधिनस्त कर्मचारी, मुर्तिजापुरचे तहसिलदार राहुल तायडे , बार्शिटाकळीचे तहसिलदार रवि काळे, तहसिलदार राजेश्वर हांडे, नायब तहसिलदार राजेंद्र इंगळे ,नगरसेवक हरिश अलिमचंदानी, संघर्ष समितीचे महादेवराव भुईभार यांच्यासह नियमित येणाऱ्या सामाजिक संस्था व संघटनेच्या प्रतिनीधीसह शेकडो नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
नगरसेविका उषाताई विरक यांचा मुलगा जसवीर सिंह विरक यांनी एक क्रेन विकत घेऊन त्यावर जाळीचा पिंजरा तयार केला व जलकुंभी काढण्याचे काम सुरू केले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक आज मोर्णा नदीत जलकुंभी काढून दाखविण्यात आले.
या मोहिमेत त्र्यंबक सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आरपीआयचे कार्यकर्ते,माजी सैनिक पुर्ननियुक्त अधिकारी/ कर्मचारी संघटना, उपविभागीय व तहसिल कार्यालय बाळापूर , तहसिल कार्यालय पातूरचे अधिकारी/ कर्मचारी ,माजी सैनिक संघटना, जिल्हा समन्वयक हरिहर जिराफे यांच्या नेतृत्वाखाली नेहरू युवा केंद्राचे कार्यकर्ते , बाळापूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे विकास कोकाटेसह त्यांचे कार्यकर्ते, पातूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटना सैनिकी मुलांचे वसतीगृहाचे विदयार्थी तसेच देशभक्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय तांदळी खुर्द ता. पातूर येथील विद्याथी, ज्योती जानोरकर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी जलकुंभी बाहेर काढून स्वच्छता केली. चांदखान यांच्या नेतृत्वात सेवा फाऊंडडेशन कार्यकर्ते, लघु व्यवसाई व्यापारी संघटना ,बोरगाव मंजू पोलीस स्टेशन पोलीस पाटील संघटना , नवथळ ग्रामपंचायतीच्या सरपंचसह ग्रामपंचायत सदस्य ,श्री हनुमान जन्मोत्सव शोभा यात्रा समितीचे कार्यकर्ते, बाळापूर उपविभागाच्या महाराष्ट राज्य पोलीस महासंघाचे कार्यकर्ते ,डॉ. तारिक अनवरनॅशनल मोबाईल मेडिकल युनिट , गुडमार्निंग किरण चौक ग्रुपचे कार्यकर्ते सहभागी झाले. आजच्या मोहिमेत मुंबईवरून अभुदय संघटनेच्या सुमिता केसवा यांच्या नेतृत्वाखाली महिला पदाधिकारी स्वच्छतेसाठी सहभागी झाल्या होत्या.
श्रमदान करणा-या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मनपाचे कैलास पुंडे सह शहर अभियंता खान, झोन अधिकारी वा.अ. वाघाळकर , आरोग्य निरिक्षक विनित पांडे, आशिष इंगोले, सुरेश पुंड, सुरज खेडकर, शाम बगेरे यांचे सक्रीय योगदान लाभले.
डॉक्टर मंडळीचा पुढाकार
नागरीकांसोबतच डॉ. राजेश काटे व डॉ. राजेंद्र वानखडे यांच्या नेतृत्वात जुने शहर डॉक्टर असोशिएशनेचे कार्यकर्ते, निमाचे डॉ. मिलींद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ. अरविंद गुप्ता, डॉ. आनंद चतुर्वेदी, निर्भय बनो जन आंदोलन , पराग गवई मित्रमंडळ, सानिका मल्टीपर्पज फाऊंडडेशनच्या रीना धोटे, सेवनस्टार बहुउददेशीय संस्था, लघु व्यवसायी व्यापारी विकास संघटना,गव्यंम सोशल वेलफेअर सोसायटी, उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या पत्नी निता खडसे ,मुलगी साना, मुलगा सनितसह विविध सामाजिक संस्था मोर्णा स्वच्छतेसाठी सहभागी झाल्या होत्या.