‘मोर्णा स्वच्छता मिशन: नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटली महिलाशक्ती; पाच हजार महिलांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 02:09 PM2018-02-10T14:09:28+5:302018-02-10T15:39:12+5:30

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.

'Morna Cleanliness Mission: women empowerment for river cleansing | ‘मोर्णा स्वच्छता मिशन: नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटली महिलाशक्ती; पाच हजार महिलांचा सहभाग

‘मोर्णा स्वच्छता मिशन: नदीच्या स्वच्छतेसाठी एकवटली महिलाशक्ती; पाच हजार महिलांचा सहभाग

Next
ठळक मुद्देशनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.स्वच्छता मोहीमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी महिलांची गर्दी उसळली होती.स्वच्छता मोहिमेत जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.

अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. त्यामुळे ‘मोर्णा माय’ स्वच्छतेसाठी शहरातील महिलाशक्ती धावल्याचा प्रत्यय आला.
जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना व कर्मचारी संघटनांच्यावतीने लोकसहभागातून मोर्णा स्वच्छता मोहीम गत १३ जानेवारीपासून प्रारंभ करण्यात आली. दर शनिवारी लोकसहभागातून राबविण्यात येत असलेल्या मोर्णा स्वच्छता मोहिमेच्या पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी शहरातील गृहिणींच्यावतीने मोर्णा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत गीता नगर भागातील मोर्णा नदीकाठी महिलांची गर्दी उसळली होती.

पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील, आमदार हरिष पिंपळे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखॉ पठाण, उपमहापौर वैशाली शेळके, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकाºयांच्या पत्नी तथा वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, माजी महापौर सुमन गावंडे, नगरसेवक हरिष आलीमचंदानी, नगरसेविका उषा विरक, किरण बोराखडे,रेडक्रॉस सोसायटीचे सचिव प्रभजीतसिंह बछेर, मनपा सहाय्यक आयुक्त डॉ.दिपाली भोसले, क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर, जिल्हाधिकाºयांचे सासरे ठाणे येथील अनिल पाटील, तहसीलदार राजेश्वर हांडे, पातूरचे तहसीलदार डॉ.रामेश्वर पुरी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे यांच्यासह नगरसेविका, महिला बचतगट, वस्तीस्तर संघ, महिला मंडळांसह अधिकाºयांच्या पत्नी, महिला अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडीसेविका व शहरातील गृहीणी सहभागी झाल्या होत्या. स्वच्छता मोहीमेत नदीपात्रातील जलकुंभी व कचरा काढण्यात आला. स्वच्छता मोहिमेत जवळपास पाच हजार महिलांनी सहभाग घेतला.त्यामुळे ‘मोर्णा माय’ स्वच्छतेसाठी शहरातील महिला शक्ती एकवटल्याचा प्रत्यय आला.

महिला बचतगट, वस्तीस्तर संघांचा उत्स्फूर्त सहभाग !
मोर्णा स्वच्छता मोहिमेत शहरातील विविध महिला बचतगट आणि वस्तीस्तर संघांच्या पदाधिकारी-सदस्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामध्ये मनपा क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र घनबहाद्दूर व त्यांच्या पत्नी मंगला घनबहाद्दूर यांच्या समवेत श्रध्दा वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष सुनंदा शिंदे, माऊली वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष अनिता मारवाल, वेणू गायधने, सार्थक वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष इंदू एललकार, एकता वस्तीस्तर संघाच्या अध्यक्ष पार्वती लहाने  यांच्यासह पूजा मनवर, दुर्गा रायझडप,पूनम जाबुकस्वार, सुशीला उमाळे, रहेमुन्नीसा, पूजा बुंदेले, कांता घावडे, मंगला घावडे, माया घाडगे, कविता सोनोने, तसेच इतर महिला बचतगट व वस्तीस्तरसंघाच्या पदाधिकारी महिलांनी सहभाग घेतला.


आदित्य ठाकरेचा मोर्णाकाठी सत्कार !
मोर्णा स्वच्छता मोहिमेत १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेत्या भारतीय संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याच्यासह त्याच्या सहकाºयांनी सहभाग घेतला. यावेळी मोर्णा नदीकाठी आदित्य ठाकरेचा जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

Web Title: 'Morna Cleanliness Mission: women empowerment for river cleansing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.