मोर्णा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:35 AM2020-08-17T10:35:34+5:302020-08-17T10:36:19+5:30

या प्रकल्पांमध्ये जवळपास ८८ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध झाला आहे.

Morna dam in Akola district 'overflow'! | मोर्णा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’!

मोर्णा प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’!

googlenewsNext

पातूर : तालुक्यातील सर्वात मोठा मोर्णा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. निर्गुणा प्रकल्प वगळता तालुक्यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. या प्रकल्पांमध्ये जवळपास ८८ दशलक्ष घनमीटर साठा उपलब्ध झाला असून, यंदा १३ हजार ५८६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तालुक्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला मोर्णा सिंचन प्रकल्प सलग दुसºया वर्षी १०० टक्के भरला आहे. सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. प्रकल्पात ४२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या प्रकल्पावर मोर्णा डावा कालवा येथून १३२१ हेक्टर, वरखेड उन्नई बंधारा येथून ४ हजार हेक्टर, असे एकूण ५ हजार १५८ हेक्टर क्षेत्रावरील सिंचन अपेक्षित आहे. तसेच या प्रकल्पातून पातूर शहरात नळ योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच देऊळगाव, पास्टुल नळ योजना कार्यान्वित होण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. निर्गुणा सिंचन प्रकल्पात सध्या ७६ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पावर ५,८३६ हेक्टर क्षेत्रावर सिंचन केल्या जाते. तसेच पातूर सिंचन तलाव शंभर टक्के भरला आहे. यातून ३०० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. तसेच तुळजापूर सिंचन प्रकल्पावर १५० हेक्टर क्षेत्र, मळसूर येथील विश्वमित्र प्रकल्प शंभर टक्के भरला असून, यावर १,८०० ते २,००० हेक्टर सिंचनाखाली येणार आहे. उमरा पांगरा रस्त्यावरील हिवरा संग्राहक तलावर ३०० हेक्टर क्षेत्र सिंचन केले जाते. जरंडी येथील प्रकल्पावर ३०० सिंचन केले जाते. गावडगाव येथील प्रकल्पावर सुमारे १५० हेक्टर क्षेत्रावर सिंचन केले जाते. शेतकरी रब्बी हंगामात गहू, हरभरा, मका तसेच उन्हाळी पिके घेतात. तालुक्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान, तालुक्यातील सर्व सिंचन प्रकल्पाच्या जलसाठ्यावर पाटबंधारे उपविभाग क्रमांक १ उपविभागीय अधिकारी अनिल राठोड आणि शाखा अभियंता गजानन अत्तरकार हे लक्ष ठेवून आहेत.


४८ तासानंतर महान धरणाचे गेट बंद!
महान धरणाच्या अतिरिक्त जलसाठ्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. १४ आॅगस्ट रोजी दोन गेट एक फुटाने उघडण्यात आले होते. ४८ तासानंतर रविवारी सकाळी ७.१५ वाजता गेट बंद करण्यात आले.

Web Title: Morna dam in Akola district 'overflow'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.