अकोल्यात खासदार आमदारांनी हाती घेतले टोपले, मोरणा नदी स्वछता मिशनला सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 09:57 AM2018-01-13T09:57:54+5:302018-01-13T11:17:35+5:30

शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोरणा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा झाला आहे

Morna River Cleanliness Mission in Akola | अकोल्यात खासदार आमदारांनी हाती घेतले टोपले, मोरणा नदी स्वछता मिशनला सुरवात

अकोल्यात खासदार आमदारांनी हाती घेतले टोपले, मोरणा नदी स्वछता मिशनला सुरवात

googlenewsNext

अकोला : शहराच्या मध्यभागातून वाहणार्‍या मोरणा नदीच्या स्वच्छता मिशनचा निमवाडीस्थित लक्झरी बस स्टॅँडमागे शनिवारी सकाळी ८ वाजता श्रीगणेशा झाला आहे. या मोहिमेत अकोलेकर मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या अभियानात  खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आ. गोवर्धन शर्मा,आ. रणधीर सावरकर, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, सर्वपक्षीय नगरसेवक विविध सामाजीक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे 
सकाळी 8 वाजता स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला
कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मोर्णा नदीची शहरातील सांडपाण्यामुळे दुरवस्था झाली आहे. नदीपात्रात जलकुंभीसह प्लास्टिक पिशव्यांचा खच जमा झाला असून, पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे दुर्गंधीमुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. लोकसहभागातून मोर्णा नदीची स्वच्छता करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेत शहरातील राजकीय, अराजकीय संस्था, संघटनांसह अकोलेरांना आवाहन केले होते जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला अकोलेकरांनी प्रतिसाद दिला असून, शनिवारी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला आहे. 

१४ पथकांचे गठन
स्वच्छता मोहिमेसाठी  तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली १४ पथकांचे गठन करण्यात आले असून, तहसीलदार, मनपाचे क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षक यांच्या समन्वयातून विविध १४ ठिकाणी साफसफाई मोहीम सुरू झाली आहे

सेवाभावी संस्थांचा पाठिंबा

मोरणा नदी स्वच्छता मिशनला शहरातील अनेक सेवाभावी संस्था, पत्रकार संघटना, कच्छी मेमन जमात, विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना, शिक्षक संघटना आदींनी पाठिंबा दिला आहे. ट्रॅक्टर वाहतूक संघटनेने २0 वाहने, महामार्गांची कामे करणार्‍या संघटनेने पोकलेन तसेच सहा जेसीबी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहेत. नेहरू पार्कचे संचालक बी.एस. देशमुख यांनी जलकुंभी काढणारे यंत्र उपलब्ध करून दिले आहे.

अनुभवी कामगार 
नदीतील जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी कामगार व जेसीबीची मदत घेतली जात आहे. त्यानंतर काठावरील जलकुंभी नागरिकांच्या मदतीने मनपाच्या ट्रॅक्टर व घंटागाडीत जमा केली जात आहे  नागरिकांच्या सुविधेसाठी सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहाय्यता पथक, पाणी व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी सज्ज आहे.

Web Title: Morna River Cleanliness Mission in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.