मोर्णा स्वच्छता मिशन :  खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी जाहीर केला प्रत्येकी १५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:27 PM2018-02-03T17:27:33+5:302018-02-03T17:29:29+5:30

खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोर्णाच्या विकासासाठी प्रत्येकी रुपये १५ लाखांचा निधी जाहीर केला आहे.

Morna Sanitation Mission: MP Sanjay Dhotre, MLA Randhir Savarkar announces Rs.15 lakh each | मोर्णा स्वच्छता मिशन :  खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी जाहीर केला प्रत्येकी १५ लाखांचा निधी

मोर्णा स्वच्छता मिशन :  खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर यांनी जाहीर केला प्रत्येकी १५ लाखांचा निधी

Next
ठळक मुद्देनिधीतून होणार घाट निर्मिती, बगीचा, प्रकाश व्यवस्थेचे काम. नदी काठी विविध विकास कामांसाठीही अनेक दात्यांकडून आर्थिक योगदान मिळत आहे.


अकोला:  जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या प्रयत्नाने लोकचळवळ बनलेल्या मोर्णा स्वच्छता मिशनसाठी आजपर्यंत हजारो लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्याचप्रमाणे नदी काठी विविध विकास कामांसाठीही अनेक दात्यांकडून आर्थिक योगदान मिळत आहे. खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोर्णाच्या विकासासाठी प्रत्येकी रुपये १५ लाखांचा निधी जाहीर केला आहे. या निधीतून नदी काठी बगीचा, घाटाची निर्मिती आणि प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या  ‘मन की बात’ या कार्यक्रमातून मोर्णा स्वच्छतेची दखल घेतल्यानंतर हे अभियान आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याने अकोलेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोर्णाच्या स्वच्छतेबरोबरच जिल्हा प्रशासनाने मोर्णाचा विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या कामासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी आपले योगदान देण्याचा निश्चय केला. खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांनी जाहीर केलेल्या प्रत्येकी रुपये १५ लाखांच्या निधीतून मोर्णा काठी घाट निर्मिती, बगीचा आणि प्रकाश व्यवस्थेचे काम केले जाणार आहे. शहराचे वैभव असणाºया मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला  १३ जानेवारीपासून प्रारंभ झाला. लोकसहभागातून ही नदी मोठया प्रमाणात स्वच्छ करण्यास यश मिळाले आहे. लहानांपासून मोठयापर्यंत सर्वांनी मोर्णाची स्वच्छता केली. नदी पूर्णपणे स्वच्छ होईपर्यंत मोर्णाची स्वच्छता केली जाणार आहे, या जिल्हाधिकाºयांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दर शनिवारी नागरिक मोर्णाच्या स्वच्छतासाठी नदी काठी येत आहेत. 

Web Title: Morna Sanitation Mission: MP Sanjay Dhotre, MLA Randhir Savarkar announces Rs.15 lakh each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.