विदर्भात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण अमरावती जिल्ह्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:10+5:302021-07-12T04:13:10+5:30
सर्वांत कमी ॲक्टिव्ह रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात कोविडच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतून झाली होती. त्यानंतर उर्वरित विदर्भ ...
Next
सर्वांत कमी ॲक्टिव्ह रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात
कोविडच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांतून झाली होती. त्यानंतर उर्वरित विदर्भ आणि महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव झाला होता. मात्र, सद्य:स्थितीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याची स्थिती चांगली दिसून येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात सद्य:स्थितीत केवळ १९ रुग्ण उपचार घेत असून, नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी आहे.
जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांची स्थिती
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण
गडचिरोली - १५१
गोंदिया - २८
वर्धा - ३८
यवतमाळ - १९
अकोला - ४४
अमरावती - २८६
बुलडाणा - ७७
वाशिम - १२६
नागपूर - १५०