सर्वाधिक अर्ज यांत्रिक शेतीसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:23+5:302021-06-26T04:14:23+5:30
अकोला : महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातून यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ...
अकोला : महाडीबीटी पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. जिल्ह्यातून यांत्रिकीकरण, सिंचन, फलोत्पादनाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये यांत्रिक शेतीसाठी सर्वाधिक १३ हजार ५९९ अर्ज प्राप्त झाले आहे.
२५ एसटी ट्रकांद्वारे मालवाहतूक
अकोला : कोरोनामुळे एसटीची प्रवासी वाहतूक अडचणीत आली आहे; मात्र मालवाहतुकीच्या माध्यमातून नुकसानीतून सावरण्यात महामंडळाला यश मिळत आहे. जिल्ह्यात २५ एसटी ट्रकांद्वारे मालवाहतूक सुरू आहे.
गळित धान्याची २६ हजार हेक्टरवर पेरणी
अकोला : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहे. आतापर्यंत केवळ २६,०१८ हेक्टरवर म्हणजेच १२ टक्के गळित धान्याची पेरणी झाली.
नागरिकांचे मास्क हनुवटीवर
अकोला : कोरोनाचा संसर्ग कायम असतानादेखील बहुतांश नागरिक नाका-तोंडाऐवजी मास्क हनुवटीवर ठेवत आहेत. याशिवाय काही जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांची कारवाई व्यर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
कांद्याला २ हजार रुपये दर
अकोला : यावर्षी शेतकऱ्यांना उन्हाळी कांद्याचे उत्पादन चांगले झाले. त्यामुळे दरवाढीच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत उच्च दर्जाच्या कांद्याला २ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्याने सांगितले.