‘नरेगा’ च्या कामांवर विदर्भात सर्वाधिक मजूर कामावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:25 AM2021-02-26T04:25:11+5:302021-02-26T04:25:11+5:30
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ३६ हजार ४८१ कामे सुरू असून, त्यावर ३ ...
अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) राज्यात ३६ हजार ४८१ कामे सुरू असून, त्यावर ३ लाख ७० हजार ३९९ मजूर काम करीत आहेत. त्यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांत सर्वाधिक २ लाख ३० हजार ४२४ मजूर कामांवर आहेत.
महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध प्रकारची कामे करण्यात येतात. राज्यातील विविध जिल्ह्यांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सद्य:स्थितीत ३६ हजार ४८१ विविध कामे सुरू आहेत. त्यामध्ये सिंचन विहिरी, शेततळे, शेतरस्ते, सिमेंटनाला बांध, गावतळे, वृक्ष लागवड आदी कामांचा समावेश आहे. ‘नरेगा अंतर्गत सुरू असलेल्या या कामांवर राज्यातील विविध जिल्ह्यात ३ लाख ७० हजार ३९९ मजूर काम करीत आहेत. त्यामध्ये विदर्भातील ११ जिल्ह्यांत सर्वाधिक २ लाख ३० हजार ४२४ मजूर ‘नरेगा’ अंतर्गत विविध कामांवर काम करीत असल्याचे चित्र आहे.
विदर्भात विभागनिहाय
असे आहेत मजूर कामावर !
विभाग मजूर
नागपूर विभाग १,३७,९६१
अमरावती विभाग ९२,४६३
.........................................................
एकूण २,३०,४२४