अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू
By राजेश शेगोकार | Updated: May 31, 2023 16:46 IST2023-05-31T16:46:37+5:302023-05-31T16:46:49+5:30
जावयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.

अकाेल्यात भीषण अपघात! कार व दूचाकीच्या धडकेत जावयासह सासुचा मृत्यू
अकाेला : पातूर तालुक्यांतील चाैढीधरण येथील जावई व सासु एकाच दुचाकीवरून जात असताना मालेगावा शेलुबाजार दरम्यान गणेशपूर नजीक कारने दूचाकीला धडक दिली. या अपघातात सासु जागीच ठार झाली. तर जावयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी, चाैढी येथील महादेव ठोंबरे(वय ३०) हे त्यांच्या सासू प्रयागबाई करवते (वय ५८) याना दूचाकीवर घेऊन ३० मेच्या संध्याकाळी पातुर तालुक्यातील उमरदरी येथे सासरी जात हाेते. मालेगाव शेलूबाजार मार्गावरील गणेशपूर नजीक त्यांच्या दूचाकीला कारने धडक दिली. या अपघाात सासु प्रयागबाई करवते यांचा जागीच मृत्यू झाला. तर महादेव ठोंबरे हे गंभीर जखमी झाले हाेते त्यांच्या डाेक्याला मार लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी हलविले मात्र बुधवारी दूपारी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.