आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 02:08 AM2017-08-01T02:08:12+5:302017-08-01T02:08:44+5:30

अकोला : नवजात बालकासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पोषण आहार आहे. बाळास शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. जन्मल्यानंतर सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ व आईच्याही फायद्याचे असते; परंतु स्तनपानाबाबत अनेक गैरसमज समाजात दिसून येतात.

Mother's milk is the best diet for the baby! | आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार!

आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार!

Next
ठळक मुद्देजागतिक स्तनपान सप्ताहस्तनपान बाळ व आईच्याही फायद्याचेस्तनदा मातांना हवा सकस आहार!






लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नवजात बालकासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम पोषण आहार आहे. बाळास शक्य तितक्या लवकर स्तनपान सुरू करणे गरजेचे असते. जन्मल्यानंतर सहा महिनेपर्यंत निव्वळ स्तनपान देणे हे बाळ व आईच्याही फायद्याचे असते; परंतु स्तनपानाबाबत अनेक गैरसमज समाजात दिसून येतात. हे गैरसमज दूर करून स्तनपानाबद्दल मातांमध्ये तसेच समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी १ ते ७ आॅगस्ट हा सप्ताह जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो.
आईचे दूध बाळासाठी उत्तम पोषाहार असून, त्यात सहज पचणारी प्रथिने, जीवनसत्त्वे व खनिजे असतात. आईचे दूध पचायला सोपे असते. जन्मल्यानंतर पहिला स्राव (चिक) किंवा ‘कोलोस्ट्रोम’ बाळासाठी अत्यंत उपयुक्त असतो; परंतु काही गैरसमजुतीमुळे चिक काढून टाकला जातो. जन्मल्यानंतर बाळास शक्य तितक्या लवकर आईचे स्तनपान देणे गरजेचे असते. बाळाला चिक पाजणे म्हणजेच नैसर्गिक लसीकरण करणे होय. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि त्याची पचनसंस्था सुधारून सुरक्षात्मक संक्रमणविरोधी वातावरण निर्माण करते. आईच्या दुधामुळे बालकाचे अ‍ॅलर्जी, अतिसार, विषाणू संसर्ग आदींपासून संरक्षण होते. बालकास सहा महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपानच करावे. त्यानंतर पुरक आहार देणे सुरू केले, तरी बाळ दोन वर्षांचे होईपर्यंत त्याला स्तनपान सुरूच ठेवावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

स्तनदा मातांना हवा सकस आहार!
बाळ हे सर्वस्वी आईच्या दुधावर निर्भर असते, त्यामुळे आईला भरपूर दूध असणे आवश्यक असते. वयाच्या दोन वर्षांपर्यंत बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. यासाठी स्तनदा मातेने गर्भावस्थेपासूनच सकस आहार घेणे व तो पुढेही सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. माता सृदृढ व आरोग्यदायी असली, तर बाळाचे आरोग्यही चांगले राहते.

बाळासाठी आईचे दूध हे अमृतसमान आहे. बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत त्याला निव्वळ स्तनपान द्यावे व त्यानंतर पुरक आहार सुरू करावा.
- डॉ. कल्पना काळे,
सहयोगी प्राध्यापक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

Web Title: Mother's milk is the best diet for the baby!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.