मोटारसायकल-ऑटोरीक्षा अपघात; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:10 AM2017-10-12T02:10:43+5:302017-10-12T02:10:46+5:30

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावर  ११ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल व ऑटोरीक्षाचा अपघात होऊन, त्यात आठ जण जखमी झाले होते. त्या जखमींना या मार्गाने वाहनातून येणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्या वाहनातून मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून जिल्ह्याच्या पालकत्वाचा परिचय दिला.

Motorcycle-autorickshaw accident; Eight injured | मोटारसायकल-ऑटोरीक्षा अपघात; आठ जखमी

मोटारसायकल-ऑटोरीक्षा अपघात; आठ जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांनी दिला जिल्ह्याच्या पालकत्वाचा परिचय

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर-अकोला महामार्गावर  ११ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल व ऑटोरीक्षाचा अपघात होऊन, त्यात आठ जण जखमी झाले होते. त्या जखमींना या मार्गाने वाहनातून येणारे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांच्या वाहनातून मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून जिल्ह्याच्या पालकत्वाचा परिचय दिला. जिल्हाधिकार्‍यांची मदत ऐनवेळी मिळाल्याने जखमींना लवकर उपचार मिळाला.जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी बुधवारी अमरावतीकडून अकोल्याकडे येत असताना रस्ता अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना शासकीय वाहनाने मूर्तिजापूरच्या उप जिल्हा रुग्णालयात पोहोचवून भर पावसात  मदत केली, हे विशेष. 

Web Title: Motorcycle-autorickshaw accident; Eight injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.