कृषी प्रक्रिया उपकरणे निर्मितीसाठी सामंजस्य करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:31 AM2017-10-18T02:31:27+5:302017-10-18T02:32:08+5:30
अकोला : अद्ययावत कृषी अवजारे, उपकरणे शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या संशोधनाला व्यावसायिक स्वरू प देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रथमच देशातील १0 खासगी निर्मात्यांसोबत मंगळवारी १२ कापणी पश्चात कृषी प्रक्रिया यंत्रे निर्मितीकरिता सामंजस्य करार केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अद्ययावत कृषी अवजारे, उपकरणे शेतकर्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या संशोधनाला व्यावसायिक स्वरू प देण्यात येणार आहे. याच अनुषंगाने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रथमच देशातील १0 खासगी निर्मात्यांसोबत मंगळवारी १२ कापणी पश्चात कृषी प्रक्रिया यंत्रे निर्मितीकरिता सामंजस्य करार केला. या कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने शेतीपयोगी अनेक अद्ययावत तंत्रज्ञान, कृषी अवजारे, उपकरणे विकसित केली आहेत; कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू दालनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगरू डॉ.व्ही.एम.भाले होते. तसेच कृषी विद्या पीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.एम.मानकर, कुलसचिव डॉ. पी.आर. कडू ,कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपकरणांच्या प्रसारावर लक्ष केंद्रित
या उपकरणांचा हवा तसा प्रसार झाला नसल्याने कृषी विद्या पीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम.भाले यांनी या विषयावर लक्ष केंद्रि त केले आहे. मोठय़ा प्रमाणावर यंत्रनिर्मितीसाठी त्यांनी अकोलासह राज्य व देशातील कंपन्यांशी अवजारे निर्मि तीसाठीचा करार केला.
-