इंधन दरवाढ, महागाईविरोधात ‘वंचित’चे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:13 AM2021-06-22T04:13:50+5:302021-06-22T04:13:50+5:30

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होऊन ...

The movement of 'deprived' against fuel price hike and inflation | इंधन दरवाढ, महागाईविरोधात ‘वंचित’चे आंदोलन

इंधन दरवाढ, महागाईविरोधात ‘वंचित’चे आंदोलन

Next

वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण होऊन बसले आहे. वैद्यकीय खर्चात नागरिकांची लूट सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाई कमी करण्याची मागणी करीत केंद्र सरकार आणि आघाडी सरकारला जागे करण्यासाठी सोमवारी वंचित बहुजन आघाडीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. सरकारने तत्काळ महागाई कमी करावी, अशी मागणी करीत तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष निर्भय पोहरे, राजेश महल्ले, प्रसिद्धी प्रमुख स्वप्निल सुरवाडे, राजू तायडे, अर्जुन टप्पे, सुनील फाटकर, अलकाताई सदार, विनोद देशमुख, डॉ. ओमप्रकाश धर्माळ, मंगेश गवई, इब्राहिम पटेल, करुणाताई गवई, उमेश गवई, बंडू राठोड, दशरथ सदार, नागेश करवते आदी सहभागी झाले होते. (फोटो)

Web Title: The movement of 'deprived' against fuel price hike and inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.