शेतकरी पुत्रांचे कृषी कार्यालयात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:23+5:302021-07-03T04:13:23+5:30
तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन वाटपाचे नियोजन करण्यात आले ; मात्र व्याळा, खिरपुरी, कळंबा व अंदुरा यासह ...
तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन वाटपाचे नियोजन करण्यात आले ; मात्र व्याळा, खिरपुरी, कळंबा व अंदुरा यासह बहुतांश गावातील कृषी सहायकांनी सदर बियाण्याकरिता शेतकऱ्यांकडून प्रति बॅग एक हजार ते दीड हजार रुपये उकळले. यामध्ये शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली असल्याचा आरोप शेतकरी पुत्रांनी केला. या कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करीत तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर शेणाचे भजे तळून कृषी अधिकारी माने यांना भेट देत अनोखे आंदोलन केले. या कृषी सहायकांवर निलंबनाची कारवाई करावी व आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, शेतकऱ्यांचे पैसे परत करावे, या मागण्या निवेदनात केल्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी शेतकरी पुत्र अक्षय साबळे, स्वप्नील पाठक, मंगेश पारस्कर, शंकर ताठे, मिलिंद इंगळे उपस्थित होते.