न्यायालयात खटला दाखल करण्याच्या हालचाली
By admin | Published: February 3, 2015 12:36 AM2015-02-03T00:36:34+5:302015-02-03T00:36:34+5:30
कॅल्शियम कार्बाइडने आंबा पिकविल्याचे प्रकरण, लोकमतने उघडकीस आणला होता प्रकार.
अकोला - जिल्ह्यातील काही कोल्ड स्टोरेजमध्ये आंबा कॅल्शियम कार्बाइडच्या साह्याने पिकविला जात असल्याचे प्रकरण मे २0१४ मध्ये ह्यलोकमतह्णने उघडकीस आणले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने बाळापूर येथून सुमारे २ हजार ७९६ किलो आंबा जप्त करून तो नष्ट केला होता. या प्रकरणी खटला आता न्यायालयात दाखल करण्याच्या हालचाली अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सुरू आहेत. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर ही जम्बो कारवाई करण्यात आली असून, तिघांविरुद्ध न्यायालयात खटलाही या आठवड्यात दाखल करण्यात येणार आहे, हे विशेष. बाळापूर नजीकच्या बाभूळखेड शिवारामध्ये असलेल्या एका कोल्ड स्टोरेजमध्ये हजारो किलो आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकविण्यात येत असल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित केल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी २ मे २0१४ रोजी छापा टाकत तब्बल १३ टन आंब्याचा साठा जप्त केला होता. सदर आंब्याचा साठा कॅल्शियम कार्बाइडने पिकविला जात असल्याचे समोर आल्यानंतर हा साठा नष्टही करण्यात आला होता. दर तिसर्या दिवशी अकोला जिल्ह्यात तब्बल ८ ते १0 ट्रक आंबे कर्नाटक येथून आणण्यात येत असत. त्यानंतर या आंब्यावर प्रक्रिया करून कच्चे आंबे पिकविले जात होते. कॅल्शियम कार्बाइडने हे आंबे पिकविले जात असल्याने आणि यामध्ये फॉस्फरस व आर्सेनिक यासारखे घातक रासायनिक घटक असल्याने ते यकृत आणि किडणीसह हृदयावर गंभीर परिणाम करणारे असल्याचे ह्यलोकमतह्णने समोर आणले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दक्षता पथकाच्या सहआयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. ह्यलोकमतह्णच्या वृत्तानंतर अमरावती येथील दक्षता पथक आणि अकोला येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांनी बाळापूर परिसरात छापेमारी करीत सुमारे १३ टन आंब्याचा साठा जप्त करून तो नष्ट केला होता. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासन विभागाने या प्रकरणात न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी पूर्ण केली असून, या आठवय़ातच हा खटला न्यायालयात उभा राहणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात तीन आरोपींचा समावेश असून, त्यांनी आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकवून नागरिकांच्या जिवाशी खेळ केल्याची माहितीही एका अधिकार्याने दिली.