वेगळ्या विदर्भासाठी मुर्तीजापूरात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:08 PM2021-08-26T16:08:55+5:302021-08-26T16:09:15+5:30
Movement in Murtijapur for a separate Vidarbha : आंदोलन सुरू असताना शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.
मूर्तिजापूर : येथे विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने वेगळा विदर्भ व्हावा या मागणीसाठी व महागाई च्या विरूध्द २६ अॉगष्ट रोजी रास्ता रोखो व जेलभरो आंदोलन करण्यात आले. सुरेश जोगळे व अरविंद तायडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले.
रास्ता रोखो आंदोलन सुरू असताना शहर पोलिसांनी आंदोलकांना अटक केली. यामधे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी वेगळा विदर्भ व महागाई विरोधात निदर्शने करण्यात आली. आंदोलनात शेतकरी संघटनेचे व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कार्यकर्ते विजय मोरे, शरद सरोदे, रवींद्र ठाकरे, बाळासाहेब तायडे, गोपाल तायडे, सुनील राजनकर, अनिल डहेलकर, विशाल सरोदे, मंगेश जोगळे, गोपाल साबळे, भास्कर जामनिक, जमीर भाई, पंकज वानखडे, शिवदास तिरकर, कैलास वानखडे, परेश चाहाउस, जगतराम महल्ले, गुलाबराव म्हसये पाटील, रामदास गायकवाड, नारायण गोंडकर, कैलास भारसाकडे, असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.