शिवसेनेच्या जिल्हा, शहरप्रमुख पदासाठी ‘मातोश्री’वर हालचाली!
By admin | Published: September 29, 2016 01:50 AM2016-09-29T01:50:07+5:302016-09-29T01:50:07+5:30
इच्छुक दावेदार मुंबईकडे रवाना: अकोला जिल्हा, शहर कार्यकारिणी होणार बरखास्त.
आशिष गावंडे
अकोला, दि. २८- जिल्ह्यासह शहरात शिवसेनेची वाटचाल लक्षात घेता, मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शिवसेना नेते तथा खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेची जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख व शहरप्रमुख पदावर कार्यक्षम चेहर्याची नियुक्ती करण्यासाठी मुंबईत ह्यमातोश्रीह्णवर जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, इच्छुक दावेदार बुधवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शेतकरी व सर्वसामान्यांवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिवसैनिकांना ह्यगाव तेथे शाखाह्ण उभारण्याचे फर्मान जारी केले होते. १९९0 च्या दशकात जिल्ह्याच्या कानाकोपर्यात पक्षाची पाळेमुळे घट्ट रोवण्यात सेनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. सेनेचा सामाजिक-राजकीय व प्रशासकीय वतरुळात प्रचंड दरारा होता. मागील काही वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सर्वसामान्य शिवसैनिकांच्या समस्यांकडे स्थानिक नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले. निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारण्याच्या भूमिकेमुळे अनेक प्रामाणिक शिवसैनिकांनी इतर राजकीय पक्षाचा मार्ग स्वीकारला. काहींनी राजकारणाच्या प्रवाहातून बाजूला होणे पसंत केले. जिल्हा असो वा शहर पदाधिकार्यांनी पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दोन्ही कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय शिवसेनेचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख तथा खा. अरविंद सावंत यांनी घेतल्याची माहिती आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मनपाच्या निवडणुकीसाठी पक्षाने कोणतीही पूर्वतयारी केली नसल्याचे खा. सावंत यांच्या निदर्शनास आले. पक्षात कार्यकर्त्यांंची मोडकळीस आलेली फळी पाहता, पक्षांतर्गत ठोस बदल करण्याचे संकेत खा. सावंत यांनी २४ सप्टेंबर रोजी दिले होते. त्या पृष्ठभूमीवर मुंबईत ह्यमातोश्रीह्णवर हालचाली सुरू झाल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख तसेच शहरप्रमुख पदासाठी इच्छुक दावेदारांना मुंबईत ह्यहाजीरह्ण होण्याचे फर्मान जारी करताच इच्छुकांची फळी मुंबईसाठी रवाना झाली.