शिक्षकांच्या समस्यांसाठी आंदोलन
By admin | Published: June 9, 2017 03:51 AM2017-06-09T03:51:17+5:302017-06-09T03:51:17+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाने सात दिवसात निकाली न काढल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशारा.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या जिल्हा परिषद प्रशासनाने सात दिवसात निकाली न काढल्यास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हा शाखेच्या वतीने १५ जून रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, मुरलीधर कुलट, अरुण वाघमारे, गजानन काळे, सचिन काठोळे, संदीप मानकर, रामभाऊ मालोकार, संतोष वाघमारे, श्याम कुलट, नितीन बंडावार, विजय वाकोडे, देवेंद्र वाकचवरे, संतोष झामरे, चंद्रशेखर पेठे, मो. वसिमोद्दीन, गजानन लोणकर, सुनील माणिकराव, संतोष इंगळे, प्रशांत देशमुख, दिनेश भटकर, मनोज वाडकर,अनिल भाकरे, मदन राठोड, मोहसिन खान, अश्विन हिंगणकर, चंद्रशेखर महाजन, रघुनाथ चव्हाण, विठ्ठल वानखडे, आशीष बाहकर, गोपाल महल्ले, श्याम हिंगणकर, विष्णू झामरे,अमोल ठाकरे, प्रमोद तायडे, सतीश तायडे पाटील, नीलेश पाटील हगवने, मनोज राठोड उपस्थित होते.