महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:04 PM2018-03-17T15:04:03+5:302018-03-17T15:04:03+5:30

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे.

movements to remove the mud of the katepurna Dam | महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

महान धरणातील गाळ काढण्यासाठी मनपाच्या हालचाली

Next
ठळक मुद्देमहान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

- आशिष गावंडे

अकोला: शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाºया काटेपूर्णा (महान धरण)प्रकल्पासह शहरानजिकच्या कापशी तलावात साचलेल्या गाळामुळे धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत आहे. सद्यस्थितीत धरणातील अत्यल्प जलसाठा ध्यानात घेता, शहरावर जलसंकटाचे सावट आहे. उन्हाळ््यात महान धरण व कापशी तलावातील गाळ उपसल्यास जलसाठ्यात वाढ होईल, या विश्वासातून सत्ताधारी भाजपा व महापालिका प्रशासनाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांना प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे.
अकोलेकरांना महान धरणातून पाणी पुरवठा केला जातो. महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया केल्यानंतर ९०० व्यासाच्या मुख्य जलवाहिनीद्वारे शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून दिल्या जाते. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. परिणामी धरणात नऊ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जून महिन्यात पावसाची शक्यता वर्तविली जात असली, तरी तोपर्यंत अकोलेकरांना धरणातील मृतसाठ्यातून पाणी पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अर्थात, उन्हाळ््यात धरण कोरडे होणार असल्याचे निश्चित मानल्या जात आहे. महान धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, त्याचा परिणाम जलसाठ्यावर होत आहे. गाळ काढल्यास धरणातील पाण्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ होईल, यात दुमत नाही. ही बाब लक्षात घेता महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने धरणातील गाळ काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसा प्रस्ताव महापौर विजय अग्रवाल यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला असून, पाटबंधारे विभागाकडून तशी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती आहे.

मनपाकडून जलजागृती सप्ताह
संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर मनपा प्रशासनाने १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताहाचे आयोजन केले आहे. नळ कनेक्शन वैध करून घेतल्यास वैधतेच्या रकमेच्या बदल्यात लागणाºया रकमेतून २५ टक्के रक्कम माफ केली जाईल. तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपाजवळ जलपुनर्भरणाची उपाययोजना केल्यास मनपातर्फे १२५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जलवाहिनी फुटल्यास जलप्रदाय विभागातील अधिकाºयांसह १८००२३३५७३३ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले आहे.

 

Web Title: movements to remove the mud of the katepurna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.