जलशुद्धीकरण केंद्रावर साैरऊर्जा प्रकल्पाच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:20 AM2021-04-28T04:20:10+5:302021-04-28T04:20:10+5:30

‘अमृत’ अभियान अंतर्गत महान येथून शहरापर्यंत आणलेली जुनी जलवाहिनी बदलणे, संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे तसेच आठ नवीन ...

Movements of Solar Energy Project at Water Treatment Plant | जलशुद्धीकरण केंद्रावर साैरऊर्जा प्रकल्पाच्या हालचाली

जलशुद्धीकरण केंद्रावर साैरऊर्जा प्रकल्पाच्या हालचाली

Next

‘अमृत’ अभियान अंतर्गत महान येथून शहरापर्यंत आणलेली जुनी जलवाहिनी बदलणे, संपूर्ण शहरात जलवाहिनीचे नवीन जाळे टाकणे तसेच आठ नवीन जलकुंभ उभारणे आदी कामांचा समावेश आहे़ तसेच याव्यतिरिक्त शहरात महापालिकेच्या खुल्या जागांवर ग्रीन झाेनची उभारणी करण्याचा समावेश आहे़ दरम्यान, या अभियानामध्ये साैरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाचाही समावेश आहे़ या कामाचा प्रकल्प अहवाल मेडा (महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण) मार्फत तयार करण्यात आला़ मेडाने या कामासाठी ८ काेटी १५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला हाेता. यामध्ये शासनाने बदल करून ६ काेटी ५२ लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला. या प्रस्तावानुसार ऊर्जा प्रकल्पातून सुमारे १४ किलाे वॅट ऊर्जा तयार हाेण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़

मनपाच्या विद्युत देयकात हाेईल बचत

महान येथील जलशुद्धीकरण केंद्रांत ६५ एमएलडी व २५ एमएलडीचे दाेन प्लांट कार्यरत आहेत. या ठिकाणी मनपाला सुमारे अडीच ते तीन लाख युनिट विजेची गरज भासते. तसेच या बदल्यात प्रशासनाला महिन्याकाठी सुमारे २२ ते २६ लाख रुपयांचे विद्युत देयक अदा करावे लागते. या ठिकाणी साैरऊर्जा प्रकल्प सुरू हाेऊन ऊर्जा निर्माण झाल्यानंतर मनपाला केवळ दाेन किंवा तीन महिन्यांचे देयक जमा करावे लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. यामुळे मनपाच्या विद्युत देयकांत माेठी बचत हाेणार आहे़

शिलाेडा येथेही प्रकल्प प्रस्तावित

‘अमृत’ अभियानच्या भूमिगत गटार याेजनेतील २७ एमएलडीचे मलशुद्धीकरण केंद्र शिलाेडा येथे उभारण्यात आले आहे. या ठिकाणीदेखील साैरऊर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे़

राज्यातील पहिला प्रकल्प

‘अमृत’ अभियान अंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र व मलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी उभारला जाणारा साैरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे़ दाेन्ही प्रकल्प यशस्वी ठरल्यास महापालिकेला माेठा दिलासा मिळणार आहे़

Web Title: Movements of Solar Energy Project at Water Treatment Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.