दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर

By आशीष गावंडे | Published: October 10, 2024 07:55 PM2024-10-10T19:55:36+5:302024-10-10T19:56:05+5:30

Akola News: समाजात धाकदपट,हाणामारी व बळाचा वापर करुन अशांतता निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइचे हत्यार उपसले आहे.

MPDA crackdown on two notorious gangsters, police system on 'Action Made' | दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर

दाेन कुख्यात गुंडांना ‘एमपीडीए’चा दणका, पाेलिस यंत्रणा ‘ॲक्शन माेड’वर

- आशिष गावंडे
अकाेला -  समाजात धाकदपट,हाणामारी व बळाचा वापर करुन अशांतता निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडांना वठणीवर आणन्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाइचे हत्यार उपसले आहे. शिवसेना वसाहतमधील लाेकमान्य नगर व गायगाव येथील अट्टल अशा दाेन गुन्हेेगारांवर एक वर्षांच्या कालावधीसाठी कारागृहात स्थानबध्दतेची कारवाइ करण्यात आली आहे. आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता पाेलिस यंत्रणा ‘अॅक्शन माेड’वर आल्याचे दिसत आहे. 

संदीप उत्तमराव पाचपाेर (३० रा.शिवसेना वसाहत लाेकमान्य नगर अकाेला) व अक्षय प्रकाश आगरकर (२५ रा. गायगाव ता.बाळापूर जि.अकाेला) अशी स्थानबध्द करण्यात आलेल्या कुख्यात आराेपींची नावे आहेत. उपराेक्त दाेन्ही आराेपींविराेधात जबरी चोरी करणे, दुखापत करणे, अश्लील कृती करणे, शांतताभंग करणे, धाकदपट करणे, घातक हत्यारांनी इजा करणे, हद्द‌पार आदेशाचे उल्लंघन करणे, बेकादेशीररित्या शस्त्र बाळगणे यांसह अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यातील संदीप पाचपाेर याच्याविराेधात घरात घुसून महिलांचा विनयभंग करणे, पाठलाग करुन महिलांचा लैगिंक छळ करण्याचेही गुन्हे दाखल आहेत. यासर्व बाबी लक्षात घेता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी कुख्यात गुंड अक्षय आगरकर व संदिप पाचपोर याच्याविराेधात स्थानबध्दतेची कारवाइ जिल्हाप्रशासनाकडे प्रस्तावित केली हाेती. या प्रस्तावाला जिल्हाप्रशासनाने ९ ऑक्टाेबर राेजी मंजूरी दिली.  
 
यांनी तयार केले प्रस्ताव
उपराेक्त कुख्यात गुंडांविराेधात बाळापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन पडघन, ‘एलसीबी’ प्रमुख शंकर शेळके, ‘पीएसआय’ माजिद पठाण, अंमलदार ज्ञानेश्वर सैरिसे, उदय शुक्ला, जुने शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लेव्हरकर, ‘पीएसआय’रविंद्र करणकर तसेच उरळ पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गोपाल ढोले, ‘पीएसआय’ गणेश कायंदे, विजयसिंग झाकर्डे, गणेश खुपसे यांच्यासह पाेलिस कर्मचाऱ्यांनी स्थानबध्दतेचा प्रस्ताव तयार केला हाेता. 
 
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गुंडगिरी खपवून घेणार नाही. त्यासाठी पाेलिस यंत्रणेला कुख्यात गुंड, गावगुंडांची इत्थंभूत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळकरी विद्यार्थीनी, तरुणी, महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास असल्यास त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा.
-बच्चन सिंह, जिल्हा पाेलिस अधीक्षक

Web Title: MPDA crackdown on two notorious gangsters, police system on 'Action Made'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.